आमदारबंधूची झाली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 02:22 AM2018-09-27T02:22:59+5:302018-09-27T02:23:09+5:30
अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्डच्या गोपनीय महितीचा उपयोग करून अज्ञात भामट्याने आमदारांचे बंधू आणि बांधकाम व्यावसायिक शंकर पांडुरंग जगताप (वय ४४, रा. पिंपळे गुरव) यांची चार लाख २६ हजार ९४७ रुपयांची फसवणूक केली.
पिंपरी - अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्डच्या गोपनीय महितीचा उपयोग करून अज्ञात भामट्याने आमदारांचे बंधू आणि बांधकाम व्यावसायिक शंकर पांडुरंग जगताप (वय ४४, रा. पिंपळे गुरव) यांची चार लाख २६ हजार ९४७ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सांगवी पोलिसांकडे बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर जगताप यांचे अमेरिकी चलनातील ५६२६.२६ डॉलर म्हणजेच भारतीय चलनातील चार लाख २६ हजार ९४७ रुपये अज्ञात भामट्याने बँक खाते हॅक करून परस्पर दुसऱ्या खात्यावर वर्ग केले. त्यांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञात भामट्याविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार आणि भारतीय दंडसंहिता कलम ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे. ए. ई. खटाळ याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.