Nirbhaya Pathak: पिंपरीत ना निर्भया, ना दामिनी पथक; मुली कशा सुरक्षित राहतील?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 11:15 AM2022-02-01T11:15:14+5:302022-02-01T11:15:23+5:30

महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात विविध जिल्हे तसेच शहरांमध्ये पोलिसांच्या दामिनी तसेच निर्भया पथकांची स्थापना केली आहे

Pimpari no nirbhaya no Damini Pathak How can girls be safe? | Nirbhaya Pathak: पिंपरीत ना निर्भया, ना दामिनी पथक; मुली कशा सुरक्षित राहतील?

Nirbhaya Pathak: पिंपरीत ना निर्भया, ना दामिनी पथक; मुली कशा सुरक्षित राहतील?

googlenewsNext

नारायण बडगुजर

पिंपरी : महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात विविध जिल्हे तसेच शहरांमध्ये पोलिसांच्या दामिनी तसेच निर्भया पथकांची स्थापना केली आहे. या पथकांकडून धडाकेबाज कारवाई सुरू आहे. मात्र पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात मनुष्यबळाअभावी ही पथके अद्याप कार्यान्वित होऊ शकलेली नाही. त्यामुळे शहरातील मुली, महिला ‘निर्भय’ कशा होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

छेडछाड, विनयभंग, लैंगिक अत्याचार यासह सामूहिक बलात्काराच्या काही घटना राज्यात घडल्या. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. त्यात राज्यातील पोलिसांच्या निर्भया आणि दामिनी पथकाच्या कामगिरीचाही आढावा घेण्यात येत आहे. काही ठिकाणी या पथकांची कामगिरी उल्लेखनीय आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत असतानाच महिला सुरक्षेबाबत जनजागृती करण्यावर या पथकांकडून भर दिला जात आहे. तसेच महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थिनींसाठी देखील स्वसंरक्षणाचे धडे या पथकांच्या माध्यमातून दिले जात आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील काही अल्पवयीन मुली, विद्यार्थीनी तसेच महिलांची छेडछाड, विनयभंग, लैंगिक अत्याचार अशा घटना सातत्याने वाढत आहेत. या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांचीही दमछाक होत आहे. शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले असले तरी मनुष्यबळाचा अभाव आहे. उपलब्ध मनुष्यबळात विविध पथके स्थापन करण्यात आली. त्यातच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारीही पोलिसांवर आहे. कामाचा अतिरिक्त ताण पोलिसांवर आहे.

एकाच पोलिसाने एकावेळी किती पथकांमध्ये काम करावे?

पोलीस आयुक्तालयास पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. सध्याच्या मनुष्यबळातून विविध पथकांची स्थापना केली आहे. तसेच नियमित कामकाज देखील या पथकांतील पोलिसांना करावे लागते. आणखी पथके कशी स्थापन करायची, एकाच अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने एकाचवेळी किती पथकांमध्ये काम करावे, हा प्रश्न आहे. त्यामुळे जबाबदारीचे वाटप कसे करावे, हा मुद्दा उपस्थित होतो, असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे पोलीस दरबारात म्हणाले होते.  

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्ग महिलांविषयक गुन्हे

वर्ष - बलात्कार - विनयभंग
२०१९ - १७१ - ४३९
२०२० - १६२ - २८५
२०२१ - १६४ - ३५१

Web Title: Pimpari no nirbhaya no Damini Pathak How can girls be safe?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.