Pimpri Breaking News: पिंपरी शहरातील शॉपिंग मॉल सुरू होणार; काय सुरू, काय बंद ? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 11:00 PM2020-07-31T23:00:54+5:302020-07-31T23:01:11+5:30

पिंपरी शहरासाठीची नवीन लॉकडाऊन नियमावली जाहीर..

Pimpri Breaking News: Shopping mall to be opened in Pimpri, double seat travel by bike | Pimpri Breaking News: पिंपरी शहरातील शॉपिंग मॉल सुरू होणार; काय सुरू, काय बंद ? जाणून घ्या

Pimpri Breaking News: पिंपरी शहरातील शॉपिंग मॉल सुरू होणार; काय सुरू, काय बंद ? जाणून घ्या

googlenewsNext
ठळक मुद्दे शहरातील सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहणार

पिंपरी :  औद्योगिक नगरी पिपरी चिंचवड शहरात शनिवार।पासून अनलॉक -३ ची अंमलबजावणी सुरू होणार आहे. शहरातील सर्व दुकाने सकाळी ९  ते सायंकाळी ७  या वेळेत सुरु राहणार आहेत. तर, शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स दिनांक ५ ऑगस्ट पासून सुरू होणार आहेत. हॉटेल मधील निवास व्यवस्था ३० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. दुचाकीवरून डबलसीट प्रवास करता येणार आहे. याबाबतची नियमावली आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शुक्रवारी जाहिर केली आहे.  

कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना राज्यात उद्यापासून अनलॉक -३ चा टप्पा सुरू होणार आहे. त्याबाबतची नियमावली महापालिकेने जारी केली आहे. रात्री आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रात्री १०.ला नियमावली जाहीर केली, यामध्ये दुकानांची वेळ दोन तासाने वाढविण्यात आली आहे. तसेच कॅटेन्मेंट झोन मधील निर्बंध कायम राहणार आहेत.
...............
 हे सुरू राहणार
१) सर्व  दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरु राहणार तर बाजारपेठेतील दुकाने पी २,  पी २ नुसार सुरू राहतील
२) शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स ५ ऑगस्ट पासून सुरू होणार
३)  हॉटेल, लॉजिंग, गेस्ट हाऊस निवास व्यवस्थेसाठी ३३ टक्के क्षमतेने सुरू
४)  शासकीय कार्यालये १५ टक्के मनुष्यबळासह सुरू
५)  क्रीडा संकुले, स्टेडियम, पालिकेची मैदाने, उद्याने  सकाळी ६ ते सायंकाळी ७पर्यंत खुली राहणार
६) औद्योगिक आस्थापना १०० टक्के क्षमतेने सुरु
७) खासगी कार्यालये, माहिती तंत्रज्ञान विषयक ५० टक्के मनुष्यबळासह सुरु, शक्य असेल तोपर्यंत वर्क फ्रॉम होम
८)सरकारच्या आदेशानुसार केशकर्तनालये, ब्युटी पार्लर सुरु राहणार
.....
या गोष्टीना बंदी

१) शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था
२) रेस्टारंट, सिनेमा हॉल,  व्यायाम शाळा.
३).जलतरण तलाव, बार, सभागृहे, नाट्यगृहे, मनोरंजन पार्क
४) सर्व प्रकारचे सामाजिक, धार्मिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजने, सांस्कृतीक, शैक्षणिक उपक्रम, सभा, संमेलने

Web Title: Pimpri Breaking News: Shopping mall to be opened in Pimpri, double seat travel by bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.