पिंपरी : महापालिकेत नोकरीच्या आमिषाने फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 06:09 AM2018-01-08T06:09:48+5:302018-01-08T06:10:11+5:30
महापालिकेत सुरक्षारक्षक पदावर नोकरी लावतो असे सांगून एका महिलेची एक लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात बनावट शिक्के आणि सह्यांचा वापर करण्यात आला आहे.
पिंपरी : महापालिकेत सुरक्षारक्षक पदावर नोकरी लावतो असे सांगून एका महिलेची एक लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात बनावट शिक्के आणि सह्यांचा वापर करण्यात आला आहे. याप्रकरणी वनमाला देवकर (वय ४२, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिषेक वाघेरे (वय ३८, रा. पिंपरी) या आरोपीविरोधात पोलिसांकडे फिर्याद दाखल झाली आहे.
वनमाला यांचा मुलगा सुमीत शिवाजी देवकर (वय २४) यांच्याकडे बनावट सह्या आणि शिक्के मारलेले महापालिकेचे नियुक्तीपत्र देण्यात आले. मुलाला नोकरी मिळावी यासाठी वनमाला यांनी टप्प्याटप्प्याने रोख रक्कम एक लाख ७२ हजार रुपये अभिषेकला दिले होते. मात्र, नोकरी मिळाली नाही.त्यामुळे फिर्यादी वनमाला यांनी थेट महापालिकेच्या सुरक्षा अधिकाºयांचे कार्यालय गाठले. सुरक्षा अधिकाºयांना ते पत्र दाखविले. अभिषेक याने दिलेले नियुक्तीपत्र बनावट असल्याचे उघड झाले. फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलिसांकडे फिर्याद नोंदवली आहे. पिंपरी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.