Pimpri Chinchwad: गुंतवणुकीवर जादा कमिशनच्या बहाण्याने १२ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 01:06 PM2023-07-22T13:06:44+5:302023-07-22T13:07:36+5:30
हा प्रकार २२ जून रोजी हिंजवडी आणि बाणेर येथे घडला...
पिंपरी : गुंतवणूक केलेल्या रकमेवर ३० ते ४० टक्के रक्कम अधिक देतो, असे आमिष दाखवून एका व्यक्तीची १२ लाख ५७ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार २२ जून रोजी हिंजवडी आणि बाणेर येथे घडला.
सुदर्शन लक्ष्मण सानप (वय ३३, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार यूपीआय आयडी, बँक खाते धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये घेऊन एक लिंक पाठवली. त्या लिंकवरील टास्क पूर्ण केल्यास गुंतवणुकीच्या रकमेवर ३० ते ४० टक्के अधिक कमिशन देण्याचे आश्वासन फिर्यादी यांना दिले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून फिर्यादी यांची १२ लाख ५७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.