इंडिया स्मार्ट सिटीज प्रोजेक्ट अवॉर्डमध्ये पिंपरी चिंचवडने पटकावला दुसरा क्रमांक

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: August 26, 2023 12:17 PM2023-08-26T12:17:54+5:302023-08-26T12:18:42+5:30

आयसक-२०२२द्वारे आयोजित केलेल्या स्पर्धेत अव्वल स्थान मिळवणारे महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड हे एकमेव शहर ठरले आहे...

Pimpri Chinchwad bagged second place in India Smart Cities Project Award | इंडिया स्मार्ट सिटीज प्रोजेक्ट अवॉर्डमध्ये पिंपरी चिंचवडने पटकावला दुसरा क्रमांक

इंडिया स्मार्ट सिटीज प्रोजेक्ट अवॉर्डमध्ये पिंपरी चिंचवडने पटकावला दुसरा क्रमांक

googlenewsNext

पिंपरी : इंडिया स्मार्ट सिटीज प्रोजेक्ट अवॉर्डमध्ये पिंपरी चिंचवडने गव्हर्नन्स विभागात स्मार्ट सारथी ॲपमध्ये दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे. तर यंदाचा इंडिया स्मार्ट सिटीज प्रोजेक्ट अवॉर्ड  मध्यप्रदेशातील इंदौर शहराला प्राप्त झाला आहे. तर चंदीगडने यूटी पुरस्कार प्राप्त केला आहे. आयसक-२०२२द्वारे आयोजित केलेल्या स्पर्धेत अव्वल स्थान मिळवणारे महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड हे एकमेव शहर ठरले आहे. 

आयसक -२०२२ स्पर्धेसाठी स्मार्ट शहरांमधून एकूण ८४५ नामांकने प्राप्त झाली होती. त्यापैकी ८० शहर पात्र ठरली होती. यामध्ये  तिस-या फेरीसाठी भारत सरकारकडून पिंपरी- चिंचवड स्मार्ट सिटीची निवड झाली होती.

गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने स्मार्ट सिटी योजना २५ जून २०१५ ला घोषित करण्यात आले होती. स्मार्ट सिटी चॅलेंजच्या १३ जुलै २०१७ ला पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची स्थापना करण्यात आलेली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांचे कामकाजाकरीता केंद्र शासन, राज्य शासन आणि पिंपरी- चिंचवड महापालिका यांच्याकडून निधी उपलब्ध करण्यात आला.

Web Title: Pimpri Chinchwad bagged second place in India Smart Cities Project Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.