Pimpri Chinchwad: छठ महापुजा निमित भव्य गंगा आरती, भाविकांची अलोट गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 08:43 AM2023-11-20T08:43:54+5:302023-11-20T08:44:41+5:30

भक्ती भावपूर्ण वातावरणात इंद्रायणी मातेची यावेळी काशी येथून आलेल्या पौरोहित्यांनी विधिवत आरती केली....

Pimpri Chinchwad: Chhath Mahapuja: Grand Ganga Aarti Devotees throng | Pimpri Chinchwad: छठ महापुजा निमित भव्य गंगा आरती, भाविकांची अलोट गर्दी 

Pimpri Chinchwad: छठ महापुजा निमित भव्य गंगा आरती, भाविकांची अलोट गर्दी 

पिंपरी : औद्योगिक नगरी पिंपरी चिंचवड शहरात रविवारी पवना, इंद्रायणी या नदीकाठी उत्तरभारतीयानी छठ महापुजा केली. मोशी येथे भव्य गंगा आरती झाली. तर चिंचवड आणि पिंपरीतही छठ महापुजा केली.
विश्व श्रीराम सेनेच्या वतीने मोशी येथे इंद्रायणी नदीच्या तीरावर रविवारी  सायंकाळी 'भव्य काशी गंगा आरती'चे आयोजन करण्यात आले होते. भक्ती भावपूर्ण वातावरणात इंद्रायणी मातेची यावेळी काशी येथून आलेल्या पौरोहित्यांनी विधिवत आरती केली.

यावेळी पालघर हिंदूशक्ती पीठ येथील स्वामी श्री भारतानंद सरस्वती महाराज, विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री शंकर गायकर, समस्त हिंदू आघाडीचे संस्थापक मिलिंद एकबोटे, आमदार महेश दादा लांडगे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक अर्जुन गुप्ता, भारतीय खाद्य महामंडळ महाराष्ट्र सल्लागार समिती सदस्य व विश्व श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संयोजक डॉ. लालबाबू अंबीकलाल गुप्ता, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, सुरेश म्हेत्रे, हभप शेष महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विश्राम कुलकर्णी, अनिल उपाध्ये, चंद्रकांत तापकीर, गणेश आंबेकर, उमेश सिंग आदींसह हजारो उत्तर भारतीय भक्त भाविक उपस्थित होते.

विश्व श्रीराम सेना यांच्या वतीने विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमासह छठ महापुजा निमित्त भव्य गंगा आरतीचे आयोजन करीत असते. या महोत्सवाची सांगता सोमवारी पहाटे पाच वाजता सूर्योदय झाल्यानंतर सूर्याला अर्ध्य  देऊन होणार आहे.  सुर्यषष्टी महाव्रत महापूजा, छोटकी छट, भव्य गंगा आरती सह विविध, धार्मिक, सामाजिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सूर्याची उपासना करण्यासाठी छटपूजेचे व्रत केले जाते. सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत असल्याचे प्राचीन काळापासूनची सामाजिक धारणा आहे. निसर्गात आणि समाजात एकरूपता साधणार्‍या या व्रतात, आस्था, प्रेम, विश्वास, त्याग आणि पर्यावरण प्रति समर्पणाची भावना आहे अशी माहिती लालबाबु गुप्ता यांनी दिली. यावेळी संजय सम्राट म्युझिकल ग्रुप यांनी धार्मिक  गीते सादर केली. संयोजनात श्याम गुप्ता, उमेश सिंग, मुन्ना सिंह, राजकुमार गुप्ता, विनोद गुप्ता, माधव गुप्ता, पप्पू गुप्ता, राजकुमार प्रसाद, संजय विश्वकर्मा आदींनी सहभाग घेतला होता.

Web Title: Pimpri Chinchwad: Chhath Mahapuja: Grand Ganga Aarti Devotees throng

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.