पिंपरी चिंचवड शहराचा पुणे जिल्ह्यात तिसरा क्रमांक; बारावीचा निकाल ९६.६४ टक्के
By प्रकाश गायकर | Updated: May 21, 2024 19:15 IST2024-05-21T19:13:57+5:302024-05-21T19:15:08+5:30
पिंपरी चिंचवडमध्ये बारावीच्या परीक्षेत ९ हजार १२२ मुले तर ८ हजार ३७७ मुली असे एकूण १७ हजार ४९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत

पिंपरी चिंचवड शहराचा पुणे जिल्ह्यात तिसरा क्रमांक; बारावीचा निकाल ९६.६४ टक्के
पिंपरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी (दि. २१) बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला. त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहराचा निकाल ९६.६४ टक्के लागला असून पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
पुणे विभागात पुणे, अहमदनगर आणि सोलापूर हे तीन जिल्हे येतात. त्यामध्ये पुणे जिल्ह्याचा निकाल सर्वात अधिक ९५.१९ टक्के लागला आहे. त्यापाठोपाठ सोलापूर जिल्हा ९४.४४ टक्के आणि तिसऱ्या क्रमांकावर अहमदनगर जिल्हा (९३.४० टक्के) आहे.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक निकाल वेल्हा तालुक्याचा (९९.२७ टक्के) लागला. त्यानंतर मुळशी तालुका (९७.१४ टक्के) असून तिसऱ्या क्रमांकावर पिंपरी-चिंचवड शहर (९६.६४ टक्के) आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून ९ हजार ५७६ मुले आणि ८ हजार ६०७ मुली असे एकूण १८ हजार १८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ९ हजार ५३७ मुलांनी तर ८ हजार ५७० मुली अशा १८ हजार १०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. बारावीच्या परीक्षेत ९ हजार १२२ मुले तर ८ हजार ३७७ मुली असे एकूण १७ हजार ४९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात मुलांचा निकाल ९५.६४ टक्के तर मुलींचा निकाल ९७.७४ टक्के लागला आहे. शहरात ४१५ मुले आणि १९३ मुली असे एकूण ६०८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
--