पिंपरीत भाजपचे सभागृह नेते एकनाथ पवार यांचा तडकाफडकी राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 04:58 PM2020-02-10T16:58:39+5:302020-02-10T17:05:53+5:30

फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता

Pimpri chinchwad corporation BJP hall leader Eknath Pawar resigns | पिंपरीत भाजपचे सभागृह नेते एकनाथ पवार यांचा तडकाफडकी राजीनामा

पिंपरीत भाजपचे सभागृह नेते एकनाथ पवार यांचा तडकाफडकी राजीनामा

googlenewsNext

पिंपरी : महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे गटनेते तथा सभागृह नेते एकनाथ पवार यांनी राजीनामा दिला आहे. याबाबतची माहिती पवार यांनीच आज सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. 
फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आली. भाजपची सत्ता येताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे समर्थक आणि निष्ठावान असलेल्या पवार यांची सभागृह नेतेपदी एकनाथ पवार यांची नियुक्ती झाली होती. त्यांना तीन वर्षाचा कार्यकाळ मिळाला. त्यांनी आज तडकाफडकी राजीनामा देण्याची घोषणा केली. पवार यांनी भाजपचे शहराध्यक्षपद भूषविले आहे. तीन वर्षात पक्षाने काम करण्याची संधी दिली मी समाधानी आहे. पुढील काळात पक्षाचे काम करणार आहे.

Web Title: Pimpri chinchwad corporation BJP hall leader Eknath Pawar resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.