पिंपरी-चिंचवड| ‘वाहनचालकांनो, पर्यायी मार्गाचा वापर करा’

By नारायण बडगुजर | Published: September 5, 2022 08:57 PM2022-09-05T20:57:13+5:302022-09-05T20:59:37+5:30

पिंपरी : गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने तळेगाव दाभाडे आणि चाकण येथील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. मंगळवारी (दि. ...

Pimpri-Chinchwad | 'Drivers, use alternate routes pune latest news | पिंपरी-चिंचवड| ‘वाहनचालकांनो, पर्यायी मार्गाचा वापर करा’

पिंपरी-चिंचवड| ‘वाहनचालकांनो, पर्यायी मार्गाचा वापर करा’

googlenewsNext

पिंपरी : गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने तळेगाव दाभाडे आणि चाकण येथील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. मंगळवारी (दि. ६) दुपारी दोन ते बुधवारी (दि. ७) पहाटे दोन या कालावधीत वाहतूक वळविण्यात आली आहे.  

तळेगाव आणि चाकण वाहतूक विभागांतर्गत हा बदल केला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी केले आहे. तळेगाव ते चाकरण रस्त्यावर सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. त्यामुळे या वाहनांनी तळेगाव एमआयडीसी फाटा- नवलाख उंब्रे - शिंदे वासुली आंबेठाठण चौक मार्गे इच्छितस्थळी जावे. 

चाकण ते तळेगाव रस्त्यावर सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे. या वाहनांनी चाकण - आंबेठाण चौक - शिंदे वासुली - नवलाख उंब्रे, तळेगाव एमआयडीसी फाटा मार्गे इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Web Title: Pimpri-Chinchwad | 'Drivers, use alternate routes pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.