Pimpri chinchwad Lockdown : पिंपरीत कारखाने, आयटी कंपन्यांना सशर्त परवानगी, मंगळवारपासून शहर राहणार कडक बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 02:43 AM2020-07-13T02:43:46+5:302020-07-13T02:44:56+5:30
फक्त अत्यावश्यक सेवाच राहणार सुरू
पिंपरी : कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू लागल्याने पिंपरी-चिंचवड मधील लॉकडाऊन अधिक सक्त करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून त्याची अंमलबजावणी मंगळवार पहाटेपासून सुरू होणार आहे. लॉकडाऊन पाचमध्ये दिलेल्या बहुतांश सुविधा बंद केल्या असून औद्योगिकनगरीतील कारखाने सशर्त सुरू ठेवण्यात येणार आहेत, दिनांक १४ ते २३ जुलै या कालखंडात लॉकडाऊन करण्यात येणार आहे, याबाबतचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रविवारी रात्री जारी केले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील कोरोनाचा आलेख वाढू लागल्याने दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊनचे सुतावोच केले होते. मात्र, हा लॉकडाऊन कसा असेल याबाबत चर्चा सुरू होती. लॉकडाऊन संदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आदेश जारी केले आहेत. १३ जुलै मध्यरात्रीपासून म्हणजेच १४ जुलैपासून लॉकडाऊन असणार आहे.
काय राहणार बंद ....
१) पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील किराणा दुकान, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, सर्व इतर व्यावसाय करणारे व्यापारी दुकाने पाच दिवस बंद राहतील त्यानंतर सकाळी ०८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी दुकाने व त्यांचे ठोक विक्रेते यांची दुकाने सुरु राहतील.
२) सार्वजनिक, खाजगी क्रिडांगणे, मोकळया जागा, उद्याने, बगीचे हे बंद राहतील. उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स (वंदे भारत योजने अंतर्गत कोविड-१९ करीता वापरात असलेले वगळुन), रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट बंद राहतील.
३) केश कर्तनालय, सलुन, स्पॉ, ब्युटी पार्लर आणि मंडई, आडत भाजी मार्केट, फळे विक्रेते, आठवडी बाजार, फेरीवाले हे सर्व ठिकाणे पाच दिवस बंद राहणार असून त्यानंतरच्या कालखंडात शेतकरी आठवडी बाजार तसेच भाजी व फळांचे विक्री करणारे अधिकृत फेरीवाले यांचे मार्फत करण्यात येणारी विक्री सकाळी ०८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू राहतील.
३) शाळा, महाविद्यालय, शैक्षणीक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णत: बंद राहतील. सार्वजनीक व खाजगी प्रवासी वाहने- दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी संपूर्णत: बंद राहतील. अत्यावश्यक सेवेतील वाहने, पुर्व परवानगी प्राम वाहने तसेच विमानतळ, रेल्वे स्टेशन येथे जाणे येणे करीता व वैद्यकीय कारणास्तव प्रवासासाठी खाजगी वाहनांचा वापर होइल.
४) शहरातील सार्वजनिक व खाजगी बस सेवा, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ट्रॅक्टर इत्यादीसाठी संपूर्णत: बंद राहतील. अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. बांधकाम, कंस्ट्रक्शनची कामे संपूर्णत: बंद राहतील. ज्या बांधकामाच्या जागेवर कामगारांची निवास व्यवस्था असेल त्यांना काम सुरू ठेवता येईल. चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक उद्योग, नाटयगृह, बार, प्रेक्षागृह, सभागृह संपूर्णत: बंद राहतील. सामाजीक, राजकीय मनोरंजन, सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम व सभा, धार्मिक स्थळे बंद राहतील.
.........................
निर्बंधासह काय सुरू राहणार
दूध वितरण सेवा सुरू, खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा त्यांचे नियमीत वेळेनूसार सुरु राहतील. मेडीकल दुकाने तसेच आॅनलाईन औषध वितरण सेवा संपुर्ण कालावधी करीता सुरु राहतील.
२) स्वराज्य संस्थेची कार्यालये तसेच सर्व खाजगी कार्यालये महाराष्ट्र शासनाचे संदर्भ क्र ४ नुसार १० टक्के कर्मचारी वर्गासह सुरु राहतील. पेट्रोलपंप व गॅसपंप सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत सुरु राहतील व ते केवळ शासकीय वाहने व अत्यावश्यक सेवेतील व पुरवठा साखळीतील वाहनास इंधन पुरवठा करतील.
३) दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिके यांची छपाई व वितरण व्यवस्था तसेच डिजीटल / प्रिंटमिडीया यांची कार्यालये शासकीय नियमानुसार सुरु राहतील. वर्तमानपत्रांचे वितरण सकाळी ६ ते ९ या वेळेमध्येच अनुज्ञेय राहील.
४) बँकेच्या इतर ग्राहकसेवा जसे आॅनलाईन, एटीएम सेवा सुरु राहतील. संपुर्ण पिंपरी चिंचवड शहराचे हददीतील न्यालालये सुरू. औषध व अन्न उत्पादन, सलग प्रक्रिया आणि निर्यात उदयोग व त्यांचे पुरवठादार नियमानुसार चालु राहतील.
५) मेट्रो, स्मार्ट सिटी, राष्ट्रीय महत्वाचे प्रकल्प, स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्प आदींची कामे सुरू.
६) सर्व औद्योगिक आस्थापना सुरू राहतील. पिंपरी चिंचवड शहरातुन परवाना असलेल्या उदयोगाना उदयोग क्षेत्रात जाण्यासाठी आणि परतीसाठी फक्त चार चाकी वाहन किंवा निश्चीत केलेल्या बसमधुनच प्रवास करता येईल. ज्या औद्योगिक आस्थापनामध्ये कोवीड-१९ चा रूग्ण आढळून येईल. त्यामधील सर्व कामगारांची कोवीड-१९ ची तपासणी स्वखर्चाने करणे बंधनकारक आहे. तसेच उद्योग बंद ठेवावा. पिंपरी चिंचवड शहरातील एम.आय.डी.सी. किंवा खाजगी जागेवरील उदयोग चालु राहणार असल्यामुळे त्यांना आवश्यक ते पास पिंपरी चिंचवड महानगपालिकेतून देण्यात येतील. माहिती तंत्रज्ञान उद्योग १५ टक्के कर्मचारी क्षमतेसह सुरु ठेवता येतील.
७) शेतमालाशी कृषि निगडीत प्रक्रिया उद्योग नियमानुसार चालु राहतील. सर्व वैद्यकीय व्यावसायीक, परिचारीका, पॅरामेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी व अँम्बुलन्स यांना शहराअंतर्गत वाहतूकीसाठी परवानगी राहिल.
....................................
यांना पूर्णपणे बंदी
१) ६५ वर्षावरील सर्व व्यक्ति, अति जोखमीचे आजार ( मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, यकृत व मुत्रपिंडाचे आजार, कर्करोग, बाधित रुग्ण इ.) असलेल्या व्यक्ति, गरोदर महिला, वय वर्षे १० पेक्षा कमी वयोगटातील मुले यांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर जाता येणार नाही. तसेच इतर कोणत्याही व्यक्तिस अत्यावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय घरा बाहेर पडता येणार नाही.
...................
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी व प्रवास करताना मास्क आवश्यक. मास्क चा वापर करणे अनिवार्य आहे. अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल. फिजिकल डिस्टन्स ठेवणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, पान, तंबाखू, इत्यादींच्या सेवनास मनाई आहे. तसेच उद्योगांनाही सशर्त परवानगी दिली आहे. नियमांचे पालन करावे.’’
...........................