महापौरांवर टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 06:42 AM2017-07-27T06:42:48+5:302017-07-27T06:42:53+5:30

महापौर नितीन काळजे यांच्या जातपडताळणी प्रमाणपत्राबाबत आज सुनावणी झाली. त्यात दक्षता पथकांच्या अहवालाशी असहमत असून दक्षता पथकांचा अहवाल नाकारून दाखला अवैध का ठरवू नये

pimpri chinchwad Mayor | महापौरांवर टांगती तलवार

महापौरांवर टांगती तलवार

Next

पिंपरी : महापौर नितीन काळजे यांच्या जातपडताळणी प्रमाणपत्राबाबत आज सुनावणी झाली. त्यात दक्षता पथकांच्या अहवालाशी असहमत असून दक्षता पथकांचा अहवाल नाकारून दाखला अवैध का ठरवू नये, अशी नोटीस महापौरांना दिली होती. त्यानुसार महापौरांनी खुलासा केला आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने याबाबत पुढील तारीख दिली आहे. त्यामुळे महापौरांपुढील अडचण वाढली आहे.
भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद हे ओबीसी गटासाठी राखीव असल्याने नितीन काळजे यांनी कुणबी जात प्रमाणपत्राच्या आधारावर निवडणूक लढविली होती. एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली होती. दरम्यान माजी नगरसेवक घनश्याम खेडेकर यांनी महापौरांच्या जात प्रमाणपत्रास आक्षेप घेतला होता. याबाबतच्या याचिकेवर सुनावणी होऊन जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले होते. जात पडताळणीसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे पाठविले होते. त्यानुसार महापौरांना समितीने नोटीस बजावली होती. दक्षता पथकाचा अहवालावरून तीन निष्कर्ष काढले होते.
याबाबत आज सुनावणी झाली. महापौरांनी आपले म्हणणे मांडले. याविषयी महापौर काळजे म्हणाले, ‘‘दक्षता समितीच्या अहवालावरून दिलेली नोटीस मिळाली. जातपडताळणी समितीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली आहे. कागदपत्रेही सादर केलेली आहेत. माझ्याकडे एक नव्हे तर मी कुणबी असल्याचे सुमारे पंधरा पुरावे आहेत.’’

Web Title: pimpri chinchwad Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.