पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प म्हणजेच जुन्याच प्रकल्पांना मुलामा : विरोधकांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 07:09 PM2020-02-19T19:09:39+5:302020-02-19T19:10:56+5:30
श्रीमंत महापालिका असतानादेखील भाजपच्या राजवटीत कर्जरोखे उभारावे लागत असून ही शोकांतिका
पिंपरी : महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर महापालिकेतील गटनेत्यांनी टीका केली आहे. अर्थसंकल्पामध्ये कोणतेही नावीन्यपूर्ण प्रकल्प नाहीत. जुन्याच प्रकल्पाला नव्याने मुलामा दिला आहे. कर्जरोखे उभारून महापालिकेला कर्जबाजारी केले जाणार आहे, अशी टीका विरोधी पक्षातील गटनेत्यांनी केली. तर पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्यासाठी भरीव तरतूद केली असल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी स्थायी समितीला सादर केला आहे. नवीन स्थापत्यविषयक प्रकल्प राबविण्यापेक्षा आयुक्तांनी राहण्यायोग्य शहर निर्माण करण्यासाठी पाऊल उचलले आहे. तसेच पाणीपुरवठा योजना आणि सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरणाचे पाऊल टाकले आहे. यावर विरोधकांनी टीका केली, तर सत्तारूढ नेत्यांनी कौतुक केले आहे.
सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, महापालिका अर्थसंकल्पात पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षणाला महत्त्व दिले आहे. महत्त्वाच्या कामाला प्राधान्य दिले आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पीएमपीएमएलकरिता तरतूद केली आहे. मेट्रो, स्मार्ट सिटी, पंतप्रधान आवास योजना, नदीसुधार योजना यांसारख्या सर्व प्रकल्पांना निधी ठेवला आहे. यामुळे अत्यंत चांगल्या पद्धतीने हा अर्थसंकल्प तयार केला आहे. दिव्यांग कल्याणकारी योजना, शहरी गरिबांसाठी अशा विविध कल्याणकारी योजनांसाठी तरतूद आहे.
विरोधी पक्षनेते नाना काटे म्हणाले, अर्थसंकल्पात नावीन्यपूर्ण काही नाही. जुन्याच योजनांना मुलामा दिला आहे. नागरिकांवर कराचा बोजा सुचविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातीलच प्रकल्प अद्यापही पूर्ण करता आले नाहीत. श्रीमंत महापालिका असतानादेखील भाजपच्या राजवटीत कर्जरोखे उभारावे लागत असून ही शोकांतिका आहे. बजेट देताना सत्ताधारी भाजप आणि आयुक्तांनी पक्षपात केला आहे. स्मार्ट प्रभागासाठी आवश्यक तरतूददेखील केली नाही.ह्णह्ण
मनसेचे गटनेते सचिन चिखले म्हणाले,ह्यह्यशहरातील नागरिकांना काय पाहिजे याचा प्रशासन आणि सत्ताधारी भाजपने अभ्यास करणे आवश्यक आहे. पूर्वीच्या मालमत्तांचा कर वाढविण्यात येणार असून हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीची भावना आहे. ह्णह्ण
शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले,ह्यह्यमूलभूत गरज असलेल्या पाणीपुरवठ्याकडे गांभीयार्ने पाहिले पाहिजे हे मान्य आहे. परंतु, कर्ज काढून नको. पाणीपुरवठ्यासाठी चारशे कोंटीचे कर्जरोखे उभारण्यापेक्षा नवीन महापालिका इमारत, यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाईच्या निविदेला विलंब झाला तरी, कोणताही फरक पडणार नाही. त्याच्या निविदा नंतर काढला येतील. त्याबाबत घाई करण्याची आवश्यकता नाही. शिक्षण, आरोग्याकडेही लक्ष द्यायला हवे.ह्णह्ण