पिंपरी- चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपला अति घाई भोवली? ३ हजारांच्या मदतीची घोषणा 'कायदेशीर' कात्रीत सापडली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 10:10 PM2021-05-26T22:10:00+5:302021-05-26T22:16:44+5:30
महापालिकेकडून कायदेशीर तरतूद न पाहताच घोषणेची घाई; लॉकडाऊन संपत आला कष्टकऱ्यांना मदत मिळणार कधी?
पिंपरी : कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लॉकडाऊन केला आहे. या कालखंडात गरीबांना मदत करावी यादृष्टीने कष्टकºयांना तीन हजार रुपये मदत देण्याची घोषणा सत्ताधारी भाजपाने केली होती. कायदेशीर तरतूद न पाहताच घोषणा केल्याने लॉक डाऊन संपत आला तरी कष्टकºयांना मदत मिळालेली नाही, यावर नाराजी व्यक्त होत आहे. कायदेशीर तरतूद नसल्याने हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.
कोरोनाचा प्रादूर्भाव राज्यात वाढू लागल्यानंतर राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडी सरकारने लॉकडाऊन केले. हा निर्णय घेताना हातावरचे पोट असणाऱ्या कष्टकरी वर्गाचा विचार त्यांनी करून आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.राज्याने निर्णय घेताच भाजपची सत्ता असणाऱ्या पिंपरी-चिचंवड महापालिकेतील पदाधिकाऱ्यानी कोणतेही नियोजन न करता, निर्णय जाहिर केला आहे. मात्र, घोषणा करून दीड महिना होत आला तरी ही घोषणा सत्यात आली नाही.
..........
अतिघाई सत्ताधाºयांना नडणार
महापालिकेतर्फे विविध योजनांअंर्तगत मदत दिली जाते. विविध कल्याणकारी योजनाशिवाय नागरिकांना थेट मदत देण्याची तरतूद महापालिकेत नाही. याबाबत कोणतेही नियोजन न करता योजना जाहिर करण्याची घाई केली. रिक्षाचालक, परवानाधारक फेरीवाले, नोंदणीकृत घरेलु कामगार, चर्मकार, नाभिक, शालेय विद्यार्थी वाहतुक करणारे चालक, जिम ट्रेनर इ. आर्थिक दुर्बल घटकातील नोंदणीकृत व्यवसाय करणाºयांना मदत कधी मिळणार? बांधकाम प्रकल्पांवर काम करणारे गवंडी, इलेक्ट्रिशियन, घरांना रंग देणारे रंगारी यांच्यासह नंदीवाले, गोंधळी, भराडी, बँडवाले, वाजंत्री असे विविध लोककलावंत आणि चित्रकार, शिल्पकार, लेखक आणि कवी वास्तव्यास आहेत. त्यांनाही मदत द्यावी, अशी मागणी केली होती.
......................
महापालिका अधिनियम ६३ अन्वये महापालिकेला मदत करण्याचा अधिकार आहे. कोवीडच्या काळात गोरगरीबांना मदत करण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केली. मात्र, प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा.
नामदेव ढाके (सत्तारूढ पक्षनेते)
...............................
केवळ घोषणा करण्यात सत्ताधाºयांना रस आहे. महापालिकेच्या कोणत्या योजनेअंतर्गत मदत करता येईल, मदत देण्याविषयीची कार्यपद्धती जाहिर केलेली नाही. अशातच काही नगरसेवकांनी अर्ज गोळा करण्यास सुरूवात केली आहे. ही बाब चुकीची आहे.
-राजू मिसाळ, विरोधी पक्षनेता
..............................
कोरोनाच्या कालखंडात गोरगरीबांना मदत करणे ही योजना चांगली आहे. मात्र, ती योजना कोणत्या नियमांनुसार देण्यात येऊ शकते. याचा अभ्यास न करता नागरिकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न महापालिकेतील सत्ताधारी करीत आहे. खरे तर ही राजकीय घोषणा ठरू नये, यासाठी नियोजन सर्व घटकांतील कष्टकºयांना लॉकडाऊन संपण्यापूर्वी प्रत्येक पाच हजार रूपये मदतीचे वाटप होणे गरजेचे आहे.
राहुल कलाटे, गटनेता शिवसेना