पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प सहा हजार काेटींचा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 12:32 PM2020-02-17T12:32:03+5:302020-02-17T12:33:27+5:30
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समितीसमाेर सादर करण्यात आला.
पिंपरी – 'श्रीमंत' पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2020-21 या आर्थिक वर्षांचा मूळ 5232 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6 हजार 628 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज सोमवारी स्थायी समितीला सादर केला.
सभापती विलास मडिगेरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या विशेष सभेमध्ये महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे यांच्या उपस्थितीत आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. महापालिकेचा हा 38 वा अर्थसंकल्प आहे. तर, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांचा तीसरा अर्थसंकल्प सादर केला आहे.
महत्त्वाचे उपक्रम
1) प्रभाग क्र. २ बो-हाडेवाडी विनायकनगर, मोशी येथे छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे पुतळा शिल्प उभारणे.
2) वेंगसरकर अॅकॅडमी येथे पॅव्हेलीयनचे काम करणे, थेरगांव येथे खेळाचे मैदान विकसित करणे, पिंपळे सौदागर आरक्षण क्रमांक ३६२ येथे खेळाचे मैदान विकसित करणे.
3) पिंपळे सौदागर आरक्षण क्रमांक ३६७ अयेथे खेळाचे मैदान विकसित करणे.या कामांसाठी एकूण तरतूद र.रु.११कोटी ८५ लाख.
4) प्रभाग क्रमांक १० पिंपरी येथील स्व्हे नं. ३१/१ -१ येथे नि:समर्थ दिव्यांगांसाठी कल्याणकारी केंद्र बांधणे, आकुर्डी येथे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय बांधणे, थेरगांव सर्व्हे नं.९ येथे बहुउद्देशीय इमारत बांधणे तसेच जिजामाता हॉस्पिटल पिंपरी येथे नविन इमारत बांधणे या कामांसाठी एकूण तरतूद र.रु.१७ कोटी ९५ लाख
5) वाकड भुजबळ वस्तीमध्ये डीपी रस्ता विकसित करणे र.रु.४ कोटी
6) ताथवडे येथील शनी मंदिराकडून मारुंजीगावाकडे जाणारा डीपी रस्ता विकसित करणे, र.रु.५ कोटी, ताथवडे गावठाणापासून पुनावळेकडे जाणारा डीपी रस्ता विकसित करणे र.रु.४ कोटी