पिंपरी चिंचवड महापालिकेकडून मैलाशुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या वापरासाठी 'मास्टर प्लॅन'  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 11:45 AM2020-10-01T11:45:49+5:302020-10-01T11:46:08+5:30

सध्या पिंपरीत १४ मैलाशुद्धीकरण केंद्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येते.

Pimpri Chinchwad Municipal Corporation has a 'Master Plan' for the use of water in the sewage treatment plant. | पिंपरी चिंचवड महापालिकेकडून मैलाशुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या वापरासाठी 'मास्टर प्लॅन'  

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून मैलाशुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या वापरासाठी 'मास्टर प्लॅन'  

Next
ठळक मुद्देमैलाशुद्धीकरण केंद्रात येणाऱ्या सुमारे २७० ते २७५ दशलक्ष लिटर प्रतिदिन सांडपाण्यावर प्रक्रिया

पिंपरी :  महापालिका क्षेत्रातील १४ मैलाशुद्धीकरण केंद्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. या प्रक्रिया केेलेल्या पाण्यापैकी २३ दशलक्ष लिटर पाण्याचा फेरवापर केला जातो. महापालिकेच्या सर्व मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त प्रमाणात पिण्याव्यतिरिक्तचा वापर करण्याच्या दृष्टीने 'मास्टर प्लॅन' तयार केला आहे.    

       पिंपरी - चिंचवड महापालिकेची सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा आहेत. महापालिका हद्दीतील सांडपाण्यावर शुद्धीकरण प्रक्रीया करण्यासाठी सद्यस्थितीत एकूण नऊ ठिकाणी ३५३ दशलक्ष लिटर प्रतिदिनी क्षमतेचे १४ मैलाशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित आहेत. त्यामध्ये रावेत (२०), आकुर्डी (३०), चिंचवड (टप्पा १ - ३०, टप्पा २ - ३०), चिखली (टप्पा १ - १६, टप्पा २ - १६), कासारवाडी (टप्पा १ - ४०, टप्पा २ - ४०, टप्पा ३ - ४०), दापोडी (२०), सांगवी (१०), पिंपळे - निलख (२०), चरहोली (टप्पा १ - २०, टप्पा २ - २१) अशा एवूâण ३५३ दशलक्ष लिटर क्षमतेच्या १४ मैलाशुद्धीकरण केंद्राचा समावेश आहे. १५६६ किलोमीटर मलनि:सारण नलिका टाकण्यात आल्या आहेत.

  मैलाशुद्धीकरण केंद्रात येणाऱ्या सुमारे २७० ते २७५ दशलक्ष लिटर प्रतिदिन सांडपाण्यावर प्रक्रीया करण्यात येत आहे. या मैलाशुद्धीकरण केंद्रातील स्काडा प्रणालीद्वारे देखरेख ठेवली जाते. स्मार्ट सिटी अंतर्गत ही स्काडा प्रणाली कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित आहे
मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रीया केलेल्या पाण्याचा पुर्नवापर केला जातो. कासारवाडी टप्पा एकच्या मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रीया केलेले पाच एमएलडी पाणी मिलीटरी डेअरी फार्ममध्ये शेतीसाठी वापरले जाते. तर, टप्पा तीनच्या मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रीया केलेले दहा एमएलडी पाणी सीएमई येथील रोर्इंग चॅनलसाठी वापरले जाते. चिखली टप्पा एक आणि दोनमधील मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रीया केलेले तीन एमएलडी पाणी संभाजीनगर, शाहूनगर भागातील महापालिकेची उद्याने, गृहरचना सोसायटींसाठी वापरण्यात येते. वायसीएम रूग्णालयातील ०.६५ एमएलडी पाणी रूग्णवाहिका धुणे आणि गार्डनिंगसाठी वापरले जाते. तसेच कासारवाडी, िंचचवड आणि आकुर्डी मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रीया केलेले पाच एमएलडी पाणी महापालिकेच्या ठिकठिकाणच्या उद्यानासाठी टँकरद्वारे वापरण्यात येते. महापालिकेच्या सर्व मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रीया केलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त प्रमाणात पिण्याव्यतिरिक्तचा वापर करण्याच्या दृष्टीने महापालिकेचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे.

Web Title: Pimpri Chinchwad Municipal Corporation has a 'Master Plan' for the use of water in the sewage treatment plant.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.