पिंपरी - चिंचवड महापालिकेकडून वृक्षगणनेबाबत चालढकल; रयत विद्यार्थी परिषदेचे झाडावर बसून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 12:44 PM2021-08-12T12:44:18+5:302021-08-12T12:44:25+5:30
वृक्षगणना आणि संवर्धन यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार केला आहे. परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून सतत चालढकल केली जात आहे
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कडून वृक्ष गणना संदर्भात चालढकल केली जात आहे. त्याचा निषेध म्हणून नेहरूनगर येथील यशवंतराव चव्हाण गुलाब पुष्प उद्यानातील झाडांवर बसून अनोखे आंदोलन केले.
वृक्षगणना आणि संवर्धन यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार केला आहे. परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून सतत चालढकल केली जात आहे. याच संदर्भात परिषदेने 6 जुलै 2021 रोजी मनपा भवनासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते. तसेच उद्यान विभाग आणि उपायुक्त सुभाष इंगळे यांनी पत्राचे उत्तर देखील दिले नाही. याचा निषेध म्हणून आम्ही रयत विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले.
लवकरात लवकर वृक्षगणना काम पुर्ण करणे, संबंधित ठेकेदार यास काळ्या यादीत टाकाणे, या संबंधित ठेकेदारास पाठिशी घालणा-या अधिका-यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. अशा काही मागण्याही त्यांनी केल्या आहेत.