पिंपरी चिंचवड महापालिकेत स्थायी समितीच्या पाच जागांवर निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 02:58 PM2018-03-20T14:58:03+5:302018-03-20T14:58:03+5:30

भाजपच्या नगरसेवकांनी स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे पाच जागा रिक्त झाल्या होत्या.

Pimpri Chinchwad Municipal Corporation selected five seats for standing committee | पिंपरी चिंचवड महापालिकेत स्थायी समितीच्या पाच जागांवर निवड

पिंपरी चिंचवड महापालिकेत स्थायी समितीच्या पाच जागांवर निवड

googlenewsNext
ठळक मुद्देमहापौर नितीन काळजे यांची नियुक्तीची घोषणा

पिंपरी चिंचवड:  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, विकास डोलस, अर्चना बारणे आणि साधना मळेकर या चार आणि अपक्ष साधना मळेकर यांची मंगळवारी निवड करण्यात आली. महापौर नितीन काळजे यांनी स्थायी समितीत नियुक्ती झाल्याची घोषणा केली. भाजपच्या नगरसेवकांनी स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे पाच जागा रिक्त झाल्या होत्या. 
महापालिका स्थायी समितीमध्ये १६ सदस्य आहेत. यामध्ये भाजपचे दहा, राष्ट्रवादीचे चार, शिवसेनेचा एक आणि अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. स्थायी समितीतील सदस्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ असतो. परंतु, सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील आठ सदस्य पहिल्या वषार्नंतर निवृत्त होतात. ती नावे चिठ्ठीद्वारे काढून निश्चित केली जातात. चिठ्ठीद्वारे भाजपचे सहा नगरसेवक बाहेर पडले होते. बाहेर पडलेल्या सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची नियुक्ती देखील झाली आहे. चिठ्ठीतून वाचलेले भाजपचे लक्ष्मण उंडे, प्रा. उत्तम केंदळे, माधुरी कुलकर्णी आणि निर्मला कुटे, तसेच भाजपसोबत असलेले अपक्षांचे गटनेते कैलास बारणे स्थायी समितीमध्ये सदस्य म्हणून कायम राहिले होते. परंतु, स्थायी समितीत पाच वर्षात ५५ नगरसेवकांना संधी देण्यासाठी 'ड्रॉ' काढण्याच्या अगोदरच भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजपच्या दहा आणि अपक्ष एक अशा ११ नगरसेवकांचे स्थायी समिती सदस्यत्वाचे राजीनामे घेतले होते. स्थायी समिती अध्यक्षपदाचा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला अडचण येऊ नये. यासाठी भाजपने चिठ्ठीतून वाचलेल्या स्थायी समिती सदस्यांचे राजीनामे मंजूर केले नव्हते. स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक निर्विघ्नपणे पार पडली. त्यामुळे पाच वर्षात ५५ नगरसेवकांना संधी देण्यासाठी घेतलेले चिठ्ठीतून वाचलेल्या स्थायी समिती नगरसेवकांचे राजीनामे महापौर नितीन काळजे यांनी शुक्रवारी मंजूर केले होते. त्यामुळे स्थायी समितीत भाजपच्या चार आणि अपक्षांची एक जागा रिक्त झाली होती. या रिक्त झालेल्या जागांवर यांची सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. सभागृह नेते एकनाथ पवार यांनी भाजपच्या तर अपक्षांचे गटनेते कैलास बारणे यांनी अपक्ष नगरसेवकाचे नावे बंद पाकिटातून महापौर नितीन काळजे यांच्याकडे दिले. त्यानंतर  संबंधितांची नावे वाचून स्थायी समितीत नियुक्ती झाल्याची घोषणा महापौर काळजे यांनी केली.

Web Title: Pimpri Chinchwad Municipal Corporation selected five seats for standing committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.