पिंपरी-चिंचवड: कॅश व्हॅन लुटीतील एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 03:15 PM2018-02-02T15:15:44+5:302018-02-02T15:16:12+5:30
राहटणी येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये ७६ लाख ५० हजार रुपये रोकड भरण्यासाठी आलेली कॅशव्हॅन पाळविणारा एका आरोपीला वाकड पोलिसांनी बीड येथून ताब्यात घेतले असून अन्य आरोपींच्या मागावर वाकड पोलीस आहेत.
पिंपरी-चिंचवड (वाकड) : राहटणी येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये ७६ लाख ५० हजार रुपये रोकड भरण्यासाठी आलेली कॅशव्हॅन पाळविणारा एका आरोपीला वाकड पोलिसांनी बीड येथून ताब्यात घेतले असून अन्य आरोपींच्या मागावर वाकड पोलीस आहेत.
कॅश व्हॅन चालक रणजित धर्मराज कोरेकर (रा.दिघी) याने बुधवारी (दि ३१) ही रोकड घेऊन व्हॅनसह पोबारा केला होता. या याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या लूट प्रकरणात याच एजन्सीत काम करणारे अन्य तीन ते चार चालक सामील असल्याचेही स्पष्ट झाले असून एकत्र काम करणाऱ्या या वाहन चालकांनी हा नियोजित कट रचल्याचे उघड झाले आहे.
वाकड पोलिसांनी कॅशव्हॅन लूट प्रकरणी ताब्यात घेतलेल्या एका आरोपीसह अन्य तीन ते चार जणांच्या मागावर आमचे पथक असून सायंकाळ पर्यंत अन्य तीन आरोपी व रोकड पोलिसांच्या ताब्यात असेल अशी विश्वासाहार्य माहिती एका बड्या अधिकऱ्याने लोकमतला दिली आहे.