वाढत्या चो-या रोखण्याबाबत उपाययोजना राबवा, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने पोलीस उपायुक्तांची घेतली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 02:36 AM2017-10-18T02:36:58+5:302017-10-18T02:37:02+5:30
औद्योगिक परिसरातील वाढणा-या चो-या रोखण्यासंदर्भात पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या पदाधिकारयांनी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांची भेट घेत चोरया रोखण्यासाठी उपाययोजना
पिंपरी : औद्योगिक परिसरातील वाढणा-या चो-या रोखण्यासंदर्भात पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या पदाधिकारयांनी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांची भेट घेत चोरया रोखण्यासाठी उपाययोजना राबविण्याची मागणी केली.
पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या शिष्टमंडळाने एम.आय.डी.सी भोसरी पोलीस स्टेशन येथे परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांची भेट घेऊन औद्योगिक परिसरातीलवाढत्या चोºया रोखण्याबाबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. या वेळी सहायक पोलीस आयुक्त राम मांडूरके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे ,पोलीस निरीक्षक राजेंद्र विभांडिक उपस्थित होते .यावेळी उपस्थित उद्योजकांनी चोºया रोखण्याबाबत विविध उपाययोजना या वेळी सुचवल्या. त्यामध्ये पेट्रोलिंग करण्यासाठी व ते ट्रेस करण्यासाठी एक डिव्हाइस ठेवणे, सी.सी.टी.व्ही कॅमेºयाच्या स्पॉटच्या सूचना निगडी, भोसरी , पिंपरी या पोलीस स्टेशनला देणे, महत्त्वाच्या पॉइंटला वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी भेट देणे इत्यादी सूचना या वेळी मांडण्यात आल्या.
या वेळी परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे म्हणाले, की चोºया रोखण्यासाठी पेट्रोलिंगशिवाय पर्याय नाही. त्यासाठी सुटीच्या काळात चोºया रोखण्यासाठी पोलीस प्रशासन तयार असून रात्रीची पोलीस गस्त वाढवण्यात येणार आहे. तसेच उद्योजकांनी काही खबरदारी घ्यावी. कंपनीमध्ये सुरक्षारक्षक अथवा कामगार कामावर ठेवताना त्यांचे पोलीस पडताळणी करावी. कंपनी अथवा घरामध्ये जादा रोख रक्कम वा दागिने ठेवूनये. कंपनीमधील मशिन व मटेरीअलचा विमा काढून ठेवावा. उद्योजक व सुरक्षारक्षक यांच्या सक्रिय सहभागाने चोºया रोखण्यात पोलीस यशस्वी होतील.बैठकीस संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे , सचिव जयंत कड , खजिनदार संजय ववले , संचालक संजय सातव, संजय आहेर , नवनाथ वायाळ,स्वीकृत संचालक प्रमोद राणे, प्रमोद दिवटे, दत्तात्रय दिवटे, भारत नरवडे, शांताराम पिसाळ, सल्लागार बशीर तरसगर, शशिकांत सराफ, विजय भिलवडे, संजय बन्सल, प्रकाश ढमाले, तसेच उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.