पिंपरीमध्ये 2 अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 08:02 AM2018-09-20T08:02:46+5:302018-09-20T13:39:30+5:30

चॉकलेटचं आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. यातील एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Pimpri Chinchwad : two minor girls raped in hinjawadi one died During medical treatment | पिंपरीमध्ये 2 अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

पिंपरीमध्ये 2 अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

Next

पिंपरी चिंचवड - चॉकलेटचं आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. यातील एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हिंजवडी परिसरातील ही धक्कादायक आणि संतापजनक घटना आहे.  याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

यातील एका आरोपीचे नाव गणेश निकम (वय 22 वर्ष)  आहे. कासारसाई येथील दोन मुली रविवारी मंदिर परिसरात खेळायला गेल्या होत्या. गणेश आणि त्याच्या साथीदाराने या दोघींना  पाहिले आणि त्यांचा पाठलाग केला. यानंतर दोघांनी मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवत मंदिरामागील जंगलात नेले आणि बलात्कार केला. घडल्या प्रकाराबाबत कोणाला काहीही सांगितले तर जीवे मारू, अशी धमकी आरोपींनी मुलींना दिला होती.  

त्यामुळे भीतीपोटी दोघींनी कुटुंबीयांना काहीही सांगितले नाही. या दोन्ही मुलींचे पालक उसतोड कामगार आहेत. दरम्यान, मंगळवारी (18 सप्टेंबर) यातील एका मुलीची प्रकृती खालावल्यानं पालकांनी तिला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वैद्यकीय तपासणीदरम्यान मुलीवर बलात्कार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले. ही गंभीर आणि हादरवणारी बाब समजल्यानंतर तातडीनं पोलिसांनी याबाबतची माहिती देण्यात आली. मुलगी बेशुद्धावस्थेत असल्यानं पोलिसांना गुन्ह्याची माहिती मिळवण्यास अडचण निर्माण होत होती. अखेर दुसऱ्या मुलीने धाडस करुन कुटुंबीयांना सर्व काही सांगितले व पोलिसांकडे तक्रार केली. यानंतर दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या.



 

Web Title: Pimpri Chinchwad : two minor girls raped in hinjawadi one died During medical treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.