थाय बॉक्सिंगमध्ये ‘पिंपरी-चिंचवड’ विजेता

By admin | Published: January 12, 2017 02:40 AM2017-01-12T02:40:59+5:302017-01-12T02:40:59+5:30

काळेवाडी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पिंपरी-चिंचवड संघाने प्रथम तर पुणे व ठाणे संघाने

Pimpri-Chinchwad winner in Thai boxing | थाय बॉक्सिंगमध्ये ‘पिंपरी-चिंचवड’ विजेता

थाय बॉक्सिंगमध्ये ‘पिंपरी-चिंचवड’ विजेता

Next

पिंपरी : काळेवाडी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पिंपरी-चिंचवड संघाने प्रथम तर पुणे व ठाणे संघाने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविला.
या स्पर्धेसाठी पाहूणे म्हणून आमदार गौैतम चाबुकस्वार, इनुस इत्तार, हाजी दस्तगीर मनियार, पाशा अत्तार, एस. डी. गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. पिंपरी चिंचवड संघाचे प्रतिनिधीत्व जमीर शिकलगार यांनी के ले. असिफ शेख यास या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून तर प्रियंका अचमंटी यांना उत्कृष्ट पंच म्हणून गौरविण्यात आले.
साक्षी देशपांडे, चैत्राली छजलानी, आसिफ शेख, साहिल रोकडे हे चौघे पिंपरी चिंचवड संघामधून प्रो थाय बॉक्सिंग
महाराष्ट्र या किताबाचे मानकरी ठरले.
स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते
कृष्णा दिवाकर, रोहित विश्वकर्मा, साहिल रोकडे, कोमल दिवाकर, तृप्ती गावडे, आकांक्षा गावडे, राम शेट्टी, अजित जैैसवार, आयुष नेहरा, आनुज भारवाल, वक्कास कुरेशी, आयशा शेख, हेतल शहा, अफताब शिकलगार, सुरज भुडे, प्राजल बाबानगर, सोनल साळुंखे, जानव्ही वर्मा, शिवराज गावडे, अमीन अत्तार, राबीया अत्तार, मनिषा चौैधरी, नमन वर्मा, श्रवण विसे, विहान खरिया, हर्षल भट्ट, रोहन पोळ, भाग्यश्री बल्लाळ, प्रेरणा परदेशी. (प्रतिनिधी)

Web Title: Pimpri-Chinchwad winner in Thai boxing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.