राजधानी दिल्लीच्या १६५०० झाडांसाठी पिंपरी-चिंचवडकर उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 20:58 IST2018-06-26T20:51:39+5:302018-06-26T20:58:05+5:30
वायू प्रदूषणाने दिल्ली रोजच मरते आहे त्यात आता १६५०० झाडे सरकारी बाबुंसाठी आणि राजकारण्यांसाठी तोडण्याचा घाट घातला आहे...

राजधानी दिल्लीच्या १६५०० झाडांसाठी पिंपरी-चिंचवडकर उतरले रस्त्यावर
पिंपरी : राजधानी दिल्लीत प्रस्तावित १६५०० वृक्षतोड करण्यात येणार आहे. याविरोधात दिल्लीकर एक लढा उभारत आहेत आणि त्या लढ्यास एक पाठिंबा म्हणून एक छोटे आंदोलन करण्यात आले. दिल्ली काय फक्त राजकारण्यांची आणि सरकारी बाबूंची पंढरी म्हणून ओळखली जाणार आहे का? आपल्या भारताची राजधानी म्हणून आपला काहीच हक्क नाही का ? वायू प्रदूषणाने दिल्ली रोजच मरते आहे त्यात आता १६५०० झाडे सरकारी बाबुंसाठी आणि राजकारण्यांसाठी तोडण्याचा घाट घातला आहे. या पर्यावरणाला हानिकारक निर्णयाविरोधात मंगळवारी ( दि. २६जून ) अंघोळीची गोळी संस्थेच्या सदस्यांनी दिल्लीमधील प्रस्तावित १६५०० वृक्ष तोडीविरोधात आंदोलन केले. ह्या सर्व प्रश्नांना काही सकारात्मक उत्तर मिळावी म्हणून पर्यावरण प्रेमी झाडांसाठी रस्त्यावर उतरले. यावेळी रोटरी क्लब वाल्हेरवाडी, डोनेट एड, रॉबिनहूड आर्मी, सेलेस्टिअल लेडीज असोसिएशन,अनुराधा गोरखे मित्र परिवार,शर्मिला ताई बाबर मंच, विवेकानंद केंद्र, रांगोळे मित्रपरिवार आदी संस्था सहभागी होत्या.
माधव पाटील म्हणाले, अंघोळीची गोळी संस्था आणि इतर सहकारी संस्था गेली तीन महिने झाडाचा एक एक खिळा शोधून झाडांना वेदनामुक्त करत आहेत आणि तिकडे साडे सोळा हजार कत्तली होणार आहे.राष्ट्रीय हरित लवादाने सर्रास ,अनधिकृत झाडे तोडण्यावर बंदी आणली आहे. तसेच संस्था जनतेच्या मदतीने आणि कायदेशीर मार्गाने भारतातील एकही झाड कोणत्याही कारणासाठी तोडले जाणार नाही, त्याचे पुनर्रोपणच होईल अशी मागणी करणार आहे, असे राजेश बाबर ह्यावेळी म्हणाले.