पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार शास्त्रीय संगीतातून सात्त्विक आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 01:37 AM2018-11-05T01:37:26+5:302018-11-05T01:38:22+5:30

गाणं हे एक संवादाचे माध्यम आहे. सूर, ताल, लय यांच्या माध्यमातून गायकाला श्रोत्यांशी संवाद साधायचा असतो. आपल्या संस्कृतीतील बंध जपण्याचे काम गाण्यातून करायचे असते.

 Pimpri-Chinchwadkar will get classical music from Sattvik Anand | पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार शास्त्रीय संगीतातून सात्त्विक आनंद

पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार शास्त्रीय संगीतातून सात्त्विक आनंद

Next

पिंपरी - गाणं हे एक संवादाचे माध्यम आहे. सूर, ताल, लय यांच्या माध्यमातून गायकाला श्रोत्यांशी संवाद साधायचा असतो. आपल्या संस्कृतीतील बंध जपण्याचे काम गाण्यातून करायचे असते. त्या त्या भौगोलिक परिवेशाला सांस्कृतिकतेचे वेगळे परिमाण देण्यात गाण्याचा वाटा मोठा आहे. त्याकरिता त्या कलेची साधना महत्त्वाची आहे. बदलत्या काळानुसार कलेत देखील तो बदल प्रतिबिंबित होतो. अशा वेळी ती कला अधिक रसिकांपर्यंत पोहोचणे, त्याला लोकाश्रय कसा मिळेल या दृष्टीने प्रयत्न करणे कलाकाराचे काम आहे. संगीत मैफलचे केलेले आयोजन श्रोत्याला निखळ व सात्विक आनंद देते. असा आजवरचा अनुभव आहे. रसिकांना देखील एक आगळा वेगळा बदल हवा आहे, असे प्रांजळ मत आघाडीचे शास्त्रीय गायक महेश काळे व्यक्त करतात.
युवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट, फिनोलेक्स पाईप्स व पीएनजी ज्वेलर्स यांच्या सहयोगाने ‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’चे आयोजन करण्यात आले आहे. यात महेश काळे आपल्या बहारदार गायकीने दिवाळीची पहाट सुरेल, सुरमय करणार आहेत. राणी पुतळाबाई वुमेन्स लॉ कॉलेज भोसरी, काका हलवाई स्वीट सेंटर, लोकमान्य मल्टिपर्पज को - आॅप. सोसायटी लि, बेव्हरेज पार्टनर ऊर्जा, आऊटडोअर पार्टनर धीरेंद्र आऊटडोअर, रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी या कार्यक्रमासाठी सहयोगी प्रायोजक आहेत.
या वेळी लोकमतशी संवाद साधताना काळे म्हणाले, ‘‘विजयाचा उत्सव म्हणजे दिवाळी. हा आनंद साजरा करण्यासाठी गोड पदार्थाने तो आनंद द्विगुणित करतो. हल्ली त्याला फटाक्यांचा मोठा आवाजाने गालबोट लागत आहे. ध्वनी, वायुप्रदूषणाने त्याचे स्वरुप गंभीर होत चालले आहे.
अमेरिकेत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम सादर करत असताना मध्यांतरात एक आजीबाई जवळ आल्या. त्या म्हणाल्या, ‘तुझ्या गाण्याने मला पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन झाले.’ ते शब्द ऐकल्यानंतर मनस्वी आनंद झाला. ग्रीन कार्ड मिळाल्यानंतर भारतात फारसे
जाणे न होणाऱ्या आजींना माझ्या गाण्याने विठुरायाचे दर्शन झाल्याचे समाधान मिळाले.
कलाकाराला यापेक्षा आणखी काय हवे असते? राग, त्याच्यातील सौंदर्य उलगडताना वेगवेगळ्या हरकती, ताना, आलाप गायक घेतो. मात्र त्या कलेचा आनंददेखील तितकाच महत्त्वाचा आहे आणि संगीताशिवाय सात्त्विक आनंद दुसरा कशात नाही.
तरुणाईला हवे असणारे, त्यांच्याशी संवाद साधणारे, त्यांना आपलेसे करणारे संगीत निर्माण करण्याची गरज आहे. मला माझ्या संगीताच्या व गायकीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहचता येते. संवाद साधता येतो.
विशेष म्हणजे अखंड ऊर्जास्रोत असलेल्या या नवीन मुलांकडून चार दोन गोष्टी आपल्याला देखील शिकायला मिळतात. यामुळे संगीताचा एक नवा बंध यानिमित्ताने जोपासला जात आहे. हा मुद्दा आणखी स्पष्ट करून देण्यासाठी मला एक उदाहरण सांगायचे आहे. ते म्हणजे इटलीत हिटलरच्या काळात जगप्रसिद्ध शिल्पकार मायकेल एंजेलोचे पुतळे पाडण्यात आले. मात्र प्रचंड कलाप्रेमी असणाºया इटलीच्या नागरिकांनी पुढे त्या पुतळ्यांचे तुकडे एकत्र जोडून एंजेलोची शिल्पे जिवंत ठेवली. आज इटलीत गेल्यानंतर एंजेलोने घडविलेले जे काही पुतळे आपण बघतो ते तेथील रसिकांची कृपा म्हणावी लागेल.
प्रत्येक ठिकाणी नव्या-जुन्या गोष्टींचा मेळ पाहावयास मिळतो. जुन्याबरोबर नव्या गोष्टींचा अनुभव घेत त्यातून सांस्कृतिकता टिकविणे महत्त्वाचे आहे. आता दररोज सकाळी तंबोºयाबरोबर नावीन्यपूर्ण गोष्टींचा शोध सुरु होतो. पुनरावृत्तीच्या धोक्याबद्दल अनेकदा विचारले जाते. अशा वेळी मला माझ्याबाबत तो धोका वाटत नसल्याचे सांगावेसे वाटते. याचे कारण म्हणजे मोठ्या प्रमाणावर सांगीतिक कार्यक्रमांच्या निमित्ताने जगभर फिरणे होते.
त्या वेळी दर वेळी नवीन असे काही गवसत जाते. ज्याचा उपयोग गायनातून करता येतो. शेवटी रसिकाच्या अंतर्मनाला संगीताची लय जाणवणे जास्त हे महत्त्वाचे.

कार्यक्रम स्थळ : शिवाजी उदय मंडळ मैदान, चिंचवड
दिनांक : बुधवार ७ नोव्हेंबर रोजी
वेळ : पहाटे ५.३0 वाजता
प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य खुला
प्रवेशिका आवश्यक

विनामूल्य प्रवेशिका खालील ठिकाणी उपलब्ध
लोकमत पिंपरी
विभागीय कार्यालय : विशाल ई-स्क्वेअर बिल्डिंग
पीएनजी ज्वेलर्स : शुभम् गौलेरिया, क्रोमच्या समोर, पिंपरी
लोकमान्य मल्टीपर्पज को-आॅपरेटिव्ह सोसायटी : पीसीएमसी लिंक रोड चिंचवडगाव, शाखा
राणी पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेज, भोसरी
काका हलवाई स्वीट
सेंटर, रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहासमोर, चिंचवड.
पं. सुधाकर चव्हाण, सर्व्हे नं. १४/१/६, शितोळेनगर, मधुबन सोसायटी चिंचवड

Web Title:  Pimpri-Chinchwadkar will get classical music from Sattvik Anand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.