पिंपरी शहर पोलीस दलाला मिळाली आणखी 'मॅन पॉवर'; १६ नवीन अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 09:01 PM2021-04-29T21:01:34+5:302021-04-29T21:03:21+5:30

उपनिरीक्षकांना सहाय्यक निरीक्षक पदावर बढती

Pimpri city police force gets more 'man power'; 16 new officers | पिंपरी शहर पोलीस दलाला मिळाली आणखी 'मॅन पॉवर'; १६ नवीन अधिकारी

पिंपरी शहर पोलीस दलाला मिळाली आणखी 'मॅन पॉवर'; १६ नवीन अधिकारी

googlenewsNext

पिंपरी : महाराष्ट्र राज्य पोलीस सेवेतील ५३९ पोलीस उपनिरीक्षकांची पदोन्नती करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक पदावर त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात नवीन १६ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. यात सात महिला अधिकारी आहेत. पिंपरी- चिंचवड आस्थापनेवरील १० उपनिरीक्षकांची पदोन्नतीवर राज्यातील अन्य ठिकाणी बदली झाली आहे.

राज्य पोलीस दलातील उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात आली आहे. अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) कुलवंत कुमार सारंगल यांनी बुधवारी (दि. २८) याबाबतचे आदेश दिले आहेत. 

पिंपरी-चिंचवड शहरात बदली झालेले पोलीस अधिकारी

मनीषा महादेव बनसोडे / मनीषा शिवाजी हाबळे (पिंपरी-चिंचवड), स्वप्नाली दत्तात्रय पलांडे (मीरा भाईंदर), वर्षा नारायण जगदाळे (सांगली), पूनम दादासाहेब जाधव (पुणे ग्रामीण), सीमा सुरेश मुंडे (पुणे ग्रामीण), राजश्री छगन खैरनार / राजश्री गणेश पावरा (मुंबई शहर), प्रमिला पांडुरंग क्षीरसागर (पुणे शहर), लुईस अँथोनी मकासरे (पुणे शहर), रमेश पंडीत यादवडे (पोलीस प्रशिक्षण केंद्र नानविज दौंड), प्रसाद सुरेश दळवी (पिंपरी-चिंचवड), तौफिक युसूफ सय्यद (मीरा-भाईंदर), नारायण आनंदराव पाटील (मुंबई शहर), कल्याण नारायण घाडगे (मुंबई शहर), संदीप आप्पासाहेब देशमुख (पुणे शहर), मनोजकुमार रामबली पांडे (हिंगोली), सिद्धनाथ भगवान बाबर (पुणे शहर / अमरावती परिक्षेत्र).

पिंपरी - चिंचवड शहरातून बदलून गेलेले अधिकारी (बदली झालेले ठिकाण) : हनमंत हरीचंद्र मिटके (नांदेड परिक्षेत्र), उत्कर्षा प्रमोद देशमुख (कोकण परिक्षेत्र), प्रशांत हनुमंत साबळे (नागपूर शहर), शरद निवृत्ती अहेर (अमरावती परिक्षेत्र), महेंद्र दिलीप पाटील (नागपूर शहर), अरविंदकुमार भीमराव हिंगोले (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), महेंद्र कारभारी आहेर (नागपूर शहर), विठ्ठल बाबासाहेब बढे (ठाणे शहर), प्रमोद रमकृष्ण कटोरे (नाशिक परिक्षेत्र), संजय धोंडीराम निलपत्रेवार (नांदेड परिक्षेत्र).

Web Title: Pimpri city police force gets more 'man power'; 16 new officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.