उद्योगनगरीतील प्रदूषित पवना नदीचे वॉटर ऑडिट कागदावरच!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 01:22 PM2019-12-11T13:22:49+5:302019-12-11T13:32:57+5:30

प्रशासनाची टाळाटाळ

Pimpri city polluted Pavana river water audit on paper! | उद्योगनगरीतील प्रदूषित पवना नदीचे वॉटर ऑडिट कागदावरच!

उद्योगनगरीतील प्रदूषित पवना नदीचे वॉटर ऑडिट कागदावरच!

Next
ठळक मुद्देतातडीने कार्यवाही अन् उपाययोजनांची आवश्यकतावॉटर ऑडिट आणि नद्यांमधील राडारोडा टाकण्याबाबत उपाययोजना नाही होत ताथवडे येथे पवना नदीतील दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू

विश्वास मोरे - 
पिंपरी : पवना नदीतील दूषित पाण्यामुळे शेकडो मासे आणि कासवांचा मृत्यू झाला़ या घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील नद्यांचे वॉटर ऑडिट करावे, अशी मागणी करूनही महापालिका प्रशासनाच्या वतीने कोणतेही ठोस कार्यवाही केली जात नसल्याचे दिसून येत आहे. वॉटर ऑडिट आणि नद्यांमधील राडारोडा टाकण्याबाबत उपाययोजना होत नाहीत.
ताथवडे येथे पवना नदीतील दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाला आहे. सहा महिन्यांपूर्वीही अशाच प्रकारची घटना घडली होती. 
तसेच नद्यांमध्ये राडारोडा टाकून नदीचे पात्र अरूंद केल्याने या वर्षी पुराचा फटकाही नदीकाठच्या भागातील नागरिकांना बसला 
होता. पिंपरी-चिंचवड शहरामधून मुळा ११ किलोमीटर, पवना २५ किलोमीटर आणि इंद्रायणी २१ किलोमीटर वाहते. महापालिकेने जलसंपदा विभागाकडून तीनही नद्यांचे सर्वेक्षण करून पूररेषेची आखणी करून घेतली आहे. या पूररेषेमध्ये होणारी अनधिकृत बांधकामे, नदीत टाकलेला राडारोड्यामुळे नदीचे पात्र अरूंद झाले आहे. जलप्रवाहाचा नैसर्गिक स्रोत बदलला आहे. या पूररेषेमधील बांधकामांवर कायदेशीर कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.
...
पंचवीस वर्षांपूर्वी नदीपात्र मोकळे होते. तेथे शेत जमीन होती़ त्यावेळी जरी पूर आला तरी नागरीवस्तीला बाधा पोहचत नव्हती़ परंतु नंतरच्या कालखंडात मात्र नद्यांच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले. त्यामुळे नद्यांना थोडा जरी पूर आला तरी नदीकाठचा नागरीवस्तीचा भाग पूरग्रस्त होतो. 
२प्रशासन यंत्रणा नेहमीप्रमाणे त्या वेळी तात्पुरती उपाययोजना करते. परंतु कायमस्वरूपी यावर आजपर्यंत तोडगा काढला गेला नाही. शहरातून एकेकाळी दोनशे अडीचशेहून अधिक ओढे-नाले होते. ओढे-नाले बुजवून त्यांच्यावर अतिक्रमण करून बांधकामे झाली आहेत.
3 नाल्यांचेही काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरतच नाही ते सगळे नदीकडे सोडले जात आहे. 

४शहरातून वाहणाºया नदी व नाल्यांच्या प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधी समवेत संयुक्तपणे एक दिवसीय चर्चासत्राची मागणी केली होती. पवना, इंद्रायणी व मुळा या नद्यांसाठी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्यास तज्ज्ञ प्रकल्प सल्लागार एचसीपी या डिझाईन प्लनिंग अँड मॅनेजमेंट अहमदाबाद यांची जून २०१८ मध्ये नेमणूक केली आहे. त्यांनी नद्यांची पाहणी करून कन्सेप्ट मास्टर प्लॉन तयार केला आहे. 
४पर्यावरण विभागाच्या ना हरकत मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. भविष्यात पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही, उपाययोजनांचा समावेश या प्रकल्पात आहे. चर्चासत्र आयोजित केले जाईल, असे आयुक्तांनी महापौर जाधव आणि राष्टÑवादीचे कलाटे यांना ६ आॅगस्ट २०१९ ला कळविले होते. त्यानंतर वॉटर आॅडिट आणि चर्चासत्र अजूनही झाले नसल्याचा आरोप राष्टÑवादी काँग्रेसने केला आहे.


महापौरांच्या पत्रावर नाही कार्यवाही 
४पवना, इंद्रायणी व मुळा या नद्यांच्या पात्रातील अतिक्रमणावर कारवाई आणि मानवी हस्तक्षेप रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात़ याबाबत महापौर राहुल जाधव आणि राष्टÑवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे. नदी प्रदूषण आणि नद्यांच्या विषयांवर सविस्तर चर्चा करावी. तसेच नद्यांचे वॉटर आॅडिट करावे, अशी मागणी केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. 
.....
नदी प्रदूषित होऊन जीवसृष्टी धोक्यात आली आहे. वॉटर आॅडिट आणि चर्चासत्राबाबत अजूनही प्रशासनाने कार्यवाही केलेली नाही. आयुक्तांना शहराच्या प्रश्नाबाबत गांभीर्य नाही. चारवेळा मागणी करूनही नदीप्रदूषणाबाबत प्रशासन असंवेदनशील असल्याचे दिसते. - मयूर कलाटे 

Web Title: Pimpri city polluted Pavana river water audit on paper!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.