पिंपरी शहराला दिवसाआड पाणी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 01:00 AM2018-03-14T01:00:16+5:302018-03-14T01:00:16+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाºया पवना धरणात ५३.५७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले असून, मे महिन्यात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे सूतोवाच महापालिका प्रशासनाने केले आहे.
पिंपरी : शहराला पाणीपुरवठा करणाºया पवना धरणात ५३.५७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले असून, मे महिन्यात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे सूतोवाच महापालिका प्रशासनाने केले आहे.
शहराला ४६० एमएलडी पाणीपुरवठा होतो. गेल्या काही महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. नगरसेवक, नागरिक आणि सत्ताधाºयांनी तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. शहरातील पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर होऊ लागली असून, एकाही भागात सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. पवना धरणातून नदीत पाणी सोडले जाते. रावेत येथील जलउपसा केंद्रातून पाणी घेऊन शहरातील टाक्यांत नेले जाते आणि तेथून शहरात पाणीपुरवठा केला जातो. धरणात ५३.५७ टक्के पाणीसाठा असून, गेल्या वर्षी याच दिवशी ५२.५० टक्के पाणीसाठा होता. हा पाणीसाठा जूनअखेरपर्यंत पुरेल एवढा आहे.