पिंपरी :आयुक्तांचा स्वीडन दौरा; किरण गित्ते यांच्याकडे पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 06:27 AM2017-11-18T06:27:50+5:302017-11-18T06:28:00+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे. स्वीडनला स्मार्ट सिटीसंदर्भात होणाºया प्रशिक्षणात आयुक्त श्रावण हर्डीकर सहभागी होणार असून, हे प्रशिक्षण शहरांचा शाश्वत विकास यावर आधारित आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे. स्वीडनला स्मार्ट सिटीसंदर्भात होणाºया प्रशिक्षणात आयुक्त श्रावण हर्डीकर सहभागी होणार असून, हे प्रशिक्षण शहरांचा शाश्वत विकास यावर आधारित आहे. आयुक्तांच्या अनुपस्थितीत पीएमआरडीएचे अध्यक्ष किरण गित्ते यांच्याकडे आठवडाभराचा महापालिकेचा अतिरिक्त कारभार असणार आहे.
महापालिकेचे महापौर नितीन काळजे स्पेनच्या दौºयावर गेले आहेत. तर उपमहापौर शैलजा मोरे पुढील आठवड्यात वैयक्तिक कामांसाठी बाहेरगावी जाणार आहेत. तर आयुक्त हर्डीकर हे शनिवारपासून स्वीडनच्या दौºयावर असणार आहेत.
‘‘शनिवारी सायंकाळी दौºयास रवाना होणार आहे. स्वीडनमधील स्वीडीश इन्स्टिट्यूटमध्ये ‘स्मार्ट सिटींचा शाश्वत विकास’ यावर प्रशिक्षण आहे. संवाद साधला जाणार आहे.
स्वीडनला स्मार्ट सिटी प्रकल्प कसा राबविला याची पाहणी करणार आहोत. त्यांनी कसे इनोव्हेशन केले. याचाही आढावा घेणार आहोत. तेथील स्मार्ट सिटी निर्माण करताना जडण-घडण कशी झाली. त्याचे टप्पे कोणते, शाश्वत स्मार्ट वाहतूक, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, आरोग्य संदर्भात कोणत्या योजना कशा राबविल्या आहेत. याचीही माहिती घेणार आहोत.
स्मार्ट सिटीचे नियोजन करताना कोणत्या योजना राबविता येतील, याविषयीही जगभरातील प्रतिनिधींशी संवाद साधणार आहोत, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
एक दिवसांचा महापौर कोण ?
येत्या २० तारखेला महापालिकेची सभा आहे. त्यास महापौर, उपमहापौर अनुपस्थित असणार आहेत. त्यामुळे सभेसाठी कोण? महापौर असेल. हा चर्चेचा विषय आहे. सत्ताधारी सभेसाठी कोणला एक दिवसाचा महापौर करतात, यातील नावाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यातच अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांची बदली झाली आहे. त्यामुळे हे पद रिक्त आहे. तसेच सहआयुक्त दिलीप गावडे वैद्यकीय रजेवर आहेत. त्यामुळे आयुक्तांच्या अनुपस्थितीत कोणाकडे पदभार असणार याबाबत उत्सुकता आहे.
अधिकाºयांना दिलासा
आठवडाभरासाठी तुकाराम मुंढे महापालिकेत येणार असल्याची चर्चा होती. मुंढे महापालिकेत आले तर काय होणार? त्यांचा धसकाही अधिकारी आणि पदाधिकाºयांनी घेतला आहे. याविषयीच्या चर्चा महापालिका वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, त्यांच्याऐवजी पीएमआरडीएचे अध्यक्ष किरण गित्ते यांच्याकडे अतिरिक्त पदभार असणार असल्याचे समजते. याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.