मराठा मोर्चाच्या आंदोलकांसाठी पिंपरी वकील निशुल्क लढणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 06:03 PM2018-08-01T18:03:21+5:302018-08-01T18:04:40+5:30

पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेटस बार असोसिएशनने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे

Pimpri lawyer will free fight for Maratha Morcha protesters | मराठा मोर्चाच्या आंदोलकांसाठी पिंपरी वकील निशुल्क लढणार 

मराठा मोर्चाच्या आंदोलकांसाठी पिंपरी वकील निशुल्क लढणार 

Next
ठळक मुद्देअटक केलेल्या सात मराठा आंदोलकांची वकिलांकडून मोफत सेवा देऊन सुटका

पिंपरी : पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेटस बार असोसिएशनने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. तसेच या मागणीसाठी सुरु असलेल्या मराठा मोर्चाच्या आंदोलकांवरील खटलेही मोफत लढणार असल्याची भूमिका वकील संघटनेने घेतला आहे. त्याबाबतचा ठराव विशेष सभा घेऊन एकमताने संमत करण्यात आला आहे. 
पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेटस बार असोसिएशनने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. तसेच या मागणीसाठी सध्या सुरु असलेल्या मराठा मोर्चाच्या आंदोलकांवरील खटलेही ही वकील संघटना मोफत लढणार आहे. विशेष सभा घेऊन एकमताने हा ठराव संमत केला आहे.दरम्यान, चिंचवड पोलिसांनी अटक केलेल्या सात मराठा आंदोलकांची वकिलांनी काल मोफत सेवा देऊन सुटका केली. बार अध्यक्ष अ‍ॅड. राजेश पुणेकर म्हणाले,आंदोलकांना मोफत कायदेशीर मदत देण्यासाठी पाच वकिलांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात आतिश लांडगे, सुनील कड, विजय शिंदे, योगेश थंबा आणि गणेश राऊत यांचा समावेश आहे.

Web Title: Pimpri lawyer will free fight for Maratha Morcha protesters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.