पिंपरी : भाजपातील पदाधिका-यांमध्ये जुंपली, ‘अर्थपूर्ण’ विषय वादाचे प्रमुख कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 06:22 AM2018-01-23T06:22:29+5:302018-01-23T06:22:40+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर पहिल्या दिवसापासून गटबाजी आणि स्थानिक नेत्यांमध्ये सुंदोपसुदी दिसून येत आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर पहिल्या दिवसापासून गटबाजी आणि स्थानिक नेत्यांमध्ये सुंदोपसुदी दिसून येत आहे. शहर समितीच्या कोअर कमिटीच्या बैठकीतच महापालिकेच्या पदाधिकाºयांमध्ये जुंपली होती. ‘अर्थपूर्ण’ विषय वादाचे प्रमुख कारण होते. मात्र, पक्षातील ज्येष्ठांनी समेट घडवून आणल्याची महापालिकेच्या वर्तुळात चर्चा होती.
महापालिकेत सत्तांतर झाल्यापासून भाजपात जुन्या-नव्यांचा वाद सुरू आहे. कधी प्रत्यक्षपणे, तर कधी अप्रत्यक्षपणे वादविवाद सुरू आहेत. एकखांबी अंमल नसल्याने महापौर, पक्षनेते, स्वीकृत, स्थायी समिती, विषय समिती सदस्य निवडीपासून तर महापालिकेतील कारभारामध्ये ठळकपणे एकमेकाविषयी असणारी असूया दिसून येत आहे. त्यातच महापालिकेतील विविध प्रकल्पांच्या निविदांत विरोधकांनी सत्ताधाºयांना आरोप करून जेरीस आणले. त्यातूनही भाजपातील गटांमध्ये अस्वस्थता जाणवू लागली आहे. तसेच आगामी लोकसभा आणि विधानसभेची गणितेही दिसू लागली आहेत.
गेल्या काही दिवसांपासूनच्या महापालिकेच्या गोंधळाविषयी पिंपळे गुरव येथे महापालिकेतील पदाधिकारी आणि भाजपा कोअर कमिटीत सोमवारी चर्चा झाली. त्या वेळी महापालिकेतील दोन पदाधिकाºयांमध्ये जुंपली होती. त्या वेळी काहींनी महापालिका सभागृहाचे कामकाज कसे चालवायचे, स्थायीसह अन्य समितींच्या सभांचे नियोजन कसे करायचे याविषयी नियोजन होणे गरजेचे आहे. समन्वय व संवादही वाढवायला हवा, असेही सूचित केले. तसेच आपल्यातील विसंवादाचा परिणाम पक्षप्रतिमेवर होत आहे, याचीही दक्षता घ्यायला हवी.
पदाचा राजीनामा देण्याची तयारी
कोअर कमिटीच्या बैठकीत दोन ज्येष्ठ पदाधिकाºयांमध्ये जुंपल्याने अन्य पदाधिकारी अवाक्च झाले. दरम्यान एका ज्येष्ठ सदस्याने महापालिकेतील महत्त्वाच्या पदाचाही राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती. त्यावेळी एका ज्येष्ठ सदस्यांनी समेट घडवून आली. महापालिकेतील ‘अर्थपूर्ण’ विषयांवरून या सदस्यांमध्ये जुपंली होती. तसेच एका ज्येष्ठ सदस्यांनेच काही प्रश्नांबाबत आयुक्तांकडे चौकशीची मागणी केल्यामुळेही वादात भर पडली आहे.
दोन ‘पदाधिकाºयांमध्ये बॉम्ब’पडल्याचीही भाजपाच्या सदस्यांत चर्चा होती. मात्र, ‘असे काही घडलेच नाही’, असा दावा एका पदाधिकाºयांने केला. या प्रकरणाबाबत सर्वांनी तोंडावर बोट ठेवले आहे. या वादास आगामी लोकसभा आणि निवडणुकीतील शह आणि काटशह देणे ही वादाला किनार असल्याचे बोलले जात आहे.