पिंपरी मंडईचा व्यवहार दिवसभर ठप्प
By admin | Published: March 11, 2016 01:36 AM2016-03-11T01:36:06+5:302016-03-11T01:36:06+5:30
पिंपरी मंडईतील अधिकृत भाजीविक्रेते व मंडईबाहेरील फेरीवाल्यांमध्ये व्यवसायाच्या कारणावरून बुधवारी वाद झाले. हा वाद विकोपाला जाऊन मंडईतील अधिकृत व्यापाऱ्यांनी फेरीवाल्यांच्या विरोधात
पिंपरी : पिंपरी मंडईतील अधिकृत भाजीविक्रेते व मंडईबाहेरील फेरीवाल्यांमध्ये व्यवसायाच्या कारणावरून बुधवारी वाद झाले. हा वाद विकोपाला जाऊन मंडईतील अधिकृत व्यापाऱ्यांनी फेरीवाल्यांच्या विरोधात मंडई बंद करण्याचा निर्णय घेतल्याने गुरुवारी नेहमी गजबजलेल्या मंडईत शुकशुकाट होता.
मंडईमध्ये पालिकेने भाडेकरारावर उपलब्ध करून दिलेल्या गाळ्यांमध्ये भाजी विक्री करणाऱ्यांकडून मंडईबाहेरील फेरीवाल्यांना विरोध केला जातो. मंडईबाहेरील फेरीवाल्यांना विरोध केला जात असल्याने या ठिकाणी हाणामारीचा प्रकार घडला. गाळ्यांमधील विक्रेता संतोष वडमारेला काहींनी मारहाण केली. त्याला मारहाण करणारे लोक नगरसेवक अरुण टाक याचे निकटवर्तीय असल्याचा आरोप गाळेधारक विक्रेत्यांनी केला. गाळ्यांमधील भाजी विक्रेत्यांची बाजू मंडई संघटनेचे अध्यक्ष विष्णू साळवे यांनी घेतली; तर वर्षानुवर्षे मंडईबाहेर रस्त्यावर विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांनाही व्यवसायाचा अधिकार असून, त्यांनी कुठे जायचे, असा मुद्दा उपस्थित झाल्याने हा वाद अधिकच चिघळला आहे. (वार्ताहर)