पिंपरी महापालिकेचा प्रशासन विभाग आपत्कालीन पूरनियंत्रणासाठी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 12:00 PM2019-07-06T12:00:26+5:302019-07-06T12:17:05+5:30
पिंपरी-चिंचवड परिसरातून पवना, इंद्रायणी आणि मूळा या नद्या वाहतात..
पिंपरी : पावसाचा जोर वाढू लागला असून महापालिकेच्या वतीने पूरनियंत्रणासाठी कंट्रोल रूम तयार केली असून स्थापत्य, आरोग्य, अग्निशमन विभाग सज्ज केला आहे. पूरातील बाधित आपत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेच्या नदीकाठच्या परिसरात प्रबोधन आणि सर्तकतेच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
मागील आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू झालेली आहे. पवनाधरणातील पाणीसाठा तेरावरून वीस टक्यांवर गेला आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातून पवना, इंद्रायणी आणि मूळा या नद्या वाहतात. संततधार सुरू असल्याने महापालिकेच्या वतीने आपत्तीव्यवस्थानाची यंत्रणा सज्ज केली आहे. त्यासाठी असणारी कंट्रोलरूम सज्ज केली आहे. तसेच क्षेत्रीय अधिकारी आपत्तीव्यवस्थापनाचे महत्वाचे क्रमांकही प्रसिद्ध केले आहेत. पावसाच्या कालखंडात आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन प्रमुख विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सुट्याही रद्द केल्या आहेत. तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सज्जतेच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कार्यकारी अभियंता, सहायक आरोग्य अधिकारी, प्रशासन अधिकारी आरोग्य अधिकारी यांना जबाबदाऱ्यांचे वाटप केले आहे. महापालिका भवना शिवाय क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पूरनियंत्रण कक्ष हा चोविस तास कार्यरत ठेवावा अशा सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी दिल्या आहेत. तसेच अग्निशमन, सुरक्षा, स्थापत्य, वायरलेस, विद्युत यांत्रिकी विभाग, वैद्यकीय व आरोग्य विभाग, माध्यमिक शिक्षण, उद्यान, पाणीपुरवठा विभागांना जबाबदाºया दिल्या आहेत.
..............................
ही आहेत पूरामुळे धोका असणारी ठिकाणे
१) पवनानदी : अ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पिंपरीतील रमाबाईनगर, भाटनगर, बौद्ध नगर परिसर. ब क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत केशनगर, चिंचवड, ड क्षेत्रीय कार्यालयांअंतर्गत पिंपळेगुरव, ग क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत संजयगांधी नगर पिंपरी, रहाटणी परिसर. ह क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत दापोडी परिसर.
२) इंद्रायणीनदी : तळवडे, चिखली गावठाण, मोशी गावठाण, डुडुळगाव आणि चºहोली गावठाण परिसर.
३) मुळा नदी : ई क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत बोपखेल गावठाण, केशनगर, ग क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत मधुबन सोसायटी, संगमनगर, ममतानगर, ह क्षेत्रीय कार्यालयांर्तगत दापोडी बौद्ध विहार, पवनावस्ती आणि पवना मुळानगर.
................
पावसाचे प्रमाण
२०१४-१५ : २५०८ मीमी
२०१५-१६ : १८६२ मीमी
२०१६-१७ : १९२७ मीमी
२०१७-१८ : ३५७० मीमी
२०१८-१९ : ३३३१ मीमी
२०१९-२० : ४९१ मीमी (जुलैपर्यंत)
............................
महत्त्वाचे संपर्क क्रमांक
१) अ प्रभाग- 8888844210
२) ब प्रभाग- 7722060926
३) क प्रभाग- 9922501942
४) ड प्रभाग- 9112272555
५) ई प्रभाग- 9822012687
६) फ प्रभाग- 9922501288
७) ग प्रभाग- 7887893077
८) ह प्रभाग- 7887893045
९) आपत्ती विभाग- 8888844210
..................
नागरिक सुरक्षेला प्राधान्य
पूरस्थितीमध्ये नागरिकांची सुरक्षा आणि त्यांना मदत करण्यासाठी यंत्रणा सज्ज केली आहे. सुरक्षा अधिकारी यांनी संक्रमण शिबिरात सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. तसेच नदी घाटांवर सुरक्षारक्षक तैनात केले जाणार आहेत. संक्रमण शिबिरांच्या जागांचीही पाहणी महापालिकेने केली आहे. वायरलेस विभागात चोवीस तास कर्मचारी तैनात राहणार आहेत. सिंचन विभाग, धरण, हवामान खाते यांच्याशी संवाद आणि संपर्क साधण्यासाठी सूचना केल्या आहेत. साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी आरोग्य विभागाने फवारणी करावी, तसेच रुग्णालयांत पुरेसा औषधपुरवठा ठेवावा, अशाही सूचना केल्या आहेत.
..............................
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले,ह्यह्यशहरातून तीन नद्या वाहतात. त्यामुळे पावसाळ्यातील पूरपरिस्थितीबाबत बैठक घेण्यात आली होती. तसेच पूरनियंत्रणाचा कृती आराखडाही तयार केला होता. पावसाळ्यापूवीर्ची कामे मे अखेरीपर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचना विभागांना केल्या होत्या. त्यानुसार नालेसफाई आणि विविध कामे पूर्ण झाली आहेत. तसेच नद्यांना पूर आल्यास कोणती दक्षता घ्यावी. यासाठी स्थापत्य, अग्निशमन, आरोग्य, विद्युत, पाणीपुरवठा आदी विभागांच्या बैठका घेऊन जबाबदाऱ्यांचे वाटप केले आहे. सर्वांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. त्याचा आढावाही घेण्यात येत आहे. महापालिका भवन आणि प्रभागस्तरांवर पूरनियंत्रणकक्षही सुरू केला आहे. याबाबत दररोज अपडेटही घेण्यात येत आहे.ह्णह्ण