पिंपरी महापालिकेकडून वारकऱ्यांना भेट, स्वागत परंपरेला सत्ताधाऱ्यांचा खोडा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 01:29 PM2019-06-17T13:29:01+5:302019-06-17T13:37:38+5:30

दिंडीप्रमुखांना भेट देण्याची परंपरा संस्कृती रक्षणाचे ढोल बडविणाऱ्या सत्ताधारी भाजपाकडून ही परंपरा खंडित केली जाणार आहे

Pimpri municipal corporation given gifts for Warkari | पिंपरी महापालिकेकडून वारकऱ्यांना भेट, स्वागत परंपरेला सत्ताधाऱ्यांचा खोडा

पिंपरी महापालिकेकडून वारकऱ्यांना भेट, स्वागत परंपरेला सत्ताधाऱ्यांचा खोडा

Next
ठळक मुद्देआषाढी वारी : पालखी सोहळ्याच्या स्वागतावरुन भाजपाच्या सत्ताधाºयांमध्ये नाही एकमतराष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती गैरव्यवहार प्रकरण उघडकीस

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून संत तुकाराममहाराज आणि संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात येते़ ही परंपरा महापालिकेच्या स्थापनेपासून सुरू आहे. दिंडीप्रमुखांना भेट देण्याची परंपरा संस्कृती रक्षणाचे ढोल बडविणाऱ्या सत्ताधारी भाजपाकडून ही परंपरा खंडित केली जाणार आहे. यंदा दिंडीप्रमुखांना कोणतीही भेट वस्तू देण्यात येणार नाही. 
पिंपरी-चिंचवड शहरातून संत ज्ञानेश्वरमहाराज आाणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या जातात. महापालिकेच्या वतीने दिंडीप्रमुखांचा सत्कार करण्यात येतो. या वेळी महापालिकेतर्फे सेवा म्हणून एक भेटवस्तू देण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती गैरव्यवहार प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतरही ताडपत्री खरेदीतील गैरव्यवहाराचे प्रकरण गाजले होते. या दोन्ही प्रकरणांची चौकशी झाल्यानंतर प्रशासकीय दिरंगाईचा फटका सत्ताधाºयांना बसला होता. 

४पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पोर्टेबल टॉयलेट पुरविण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे साडेतेरा लाख रुपये खर्च येणार आहे. संत तुकाराममहाराज यांचा पालखी सोहळा २५ जून रोजी आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये मुक्कामी असणार आहे. पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे विविध सेवा, सुविधा पुरविण्यात येतात. त्यामध्ये फिरते शौचालयाची (पोर्टेबल टॉयलेट) सुविधादेखील पुरविण्यात येते. गेल्या वर्षी या कामासाठी ई-निविदा मागविली होती. त्यासाठी महापालिकेतर्फे  २८३२ रुपये प्रतिनग दर प्रसिद्ध केला होता.
 
सेक्यूअर आयटी मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड केवळ या एकाच कंपनीतर्फे निविदा सादर केली होती. त्यांनीदेखील महापालिकेच्या अंदाजपत्रकीय दरापेक्षा १६.५२ टक्के अधिक दराने हे पोर्टेबल टॉयलेट देण्याची निविदा सादर केली होती. या कंपनीने प्रतिनग ३३०० रुपये दर निविदेद्वारे सादर केला. वारकऱ्यांची सोय होणे गरजेचे असल्याने महापालिकेतर्फे हा दर स्वीकारून दीड दिवसांसाठी तीनशे पोर्टेबल टॉयलेट भाडेतत्त्वावर घेण्यात आले. यंदाही त्याच दराने ४१० नग पोर्टेबल टॉयलेट घेण्याचे महापालिकेतर्फे ठरविले आहे.
............
* महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयासाठी ३००, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयासाठी ८०, तर ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयासाठी ३० असे प्रत्येकी एक सिट असलेले ४१० पोर्टेबल टॉयलेट भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. वारकऱ्यांना ही सुविधा पुरविण्यासाठी प्रतिनग दराप्रमाणे १३ लाख ५३ हजार रुपये खर्च येणार आहे. आवश्यकता भासल्यास याच दराने अधिक पोर्टेबल टॉयलेट उपलब्ध करून घेण्यात येणार असून, त्यासाठी येणाऱ्या खर्चाला महापालिका स्थायी समिती सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले. 
.................
* निष्क्रिय भाजपा सत्ताधारी
वारीच्या सोहळ्यात वारकरी कोणतीही गोष्टी मागत नाहीत. परंतु विविध पक्ष, राजकीय नेते, वारीची सेवा करीत असतात. भेटवस्तू देत असतात. अधिकाºयांचा वारीत इंट्रेस्ट नसल्याने सत्ताधाऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम करीत आहे. त्यामुळे वारकऱ्यांचे स्वागत आणि भेटवस्तू देण्याची परंपरा यावर्षी खंडित केली जाणार आहे. संस्कृती रक्षणाचे ढोल बडविणाऱ्या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना वारी परंपरेचा विसर पडला असल्याची टीका होत आहे.
........
चौकशी समितीच्या शिफारशी बासनात
मूर्ती आणि ताडपत्री गैरव्यवहार प्रकरण चौकशीसाठी नियुक्त केलेल्या समितीने प्रशासनास काही शिफारशी केल्या होत्या. त्यात वर्षभरातील सण उत्सवांचे नियोजन करावे. वेळापत्रक बनवावे व उत्सवापूर्वी काही महिने अगोदरच निविदा प्रक्रिया राबवावी, अशा सूचना केल्या होत्या. मात्र, या शिफारशी प्रशासनाने बासनात बांधल्या आहेत. 
..........
* वारीतील वारकरी कोणतीही गोष्ट मागत नसतात. वारी ही निस्पृह सेवा आहे. आपली परंपरा आहे. देहू आणि आळंदी ही तीर्थक्षेत्रे शहराच्या सीमेवर आहे. वारी हे आपले भूषण आहे. त्यामुळे वारीतील दिंडीप्रमुखांचे स्वागत करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे संस्कृती रक्षणाचे ढोल बडविणाऱ्या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना वारी परंपरेचा विसर पडला असला तरी विरोधीपक्षातर्फे स्वागत केले जाणार आहे. परंपरा खंडित केली जाणार नाही.- दत्ता साने, विरोधीपक्षनेते 
..........

Web Title: Pimpri municipal corporation given gifts for Warkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.