पिंपरी महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता ही सेवा उपक्रम राबविण्यात येणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 08:46 PM2018-09-25T20:46:06+5:302018-09-25T20:54:25+5:30

माध्यमिक व प्राथमिक विदयालयात उपक्रम राबविताना सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छता शपथ, स्वच्छता विषयक निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व स्वच्छता रॅलीचे आयोजन केले आहे.

Pimpri Municipal Corporation's swachhta hi seva will be implemented still on 02 October | पिंपरी महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता ही सेवा उपक्रम राबविण्यात येणार 

पिंपरी महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता ही सेवा उपक्रम राबविण्यात येणार 

Next
ठळक मुद्देमुख्याध्यापकांना शाळेतील शिक्षकांची सभा घेऊन नियोजनानुसार कार्यक्रम राबविण्याच्या सूचना घरामध्ये निर्माण होणारा कचरा ओला व सुका अशी वर्गीकरण वेगवेगळा करणे बंधनकारक अभियानात जास्तीत जास्त नागरिक, विदयार्थी, शिक्षक यांचा सहभाग असणे गरजेचे

पिंपरी: महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरी विकास मंत्रालयाचे निदेर्शानुसार ०२ आॅक्टोंबरपरयत  स्वच्छता ही सेवा  हा उपक्रम राबविण्याचे जाहीर केले आहे. स्वच्छता ही सेवा उपक्रमाविषयी माध्यमिक व प्राथमिक विदयालयातील मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन करण्यासाठी पद्मविभूषण कर्मवीर भाऊराव पाटील विदयामंदीर सभागृहात कार्यशाळा झाली. स्वच्छता ही सेवा या उपक्रमाबाबत अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी यावेळी मार्गदर्शन  केले. समिर पालपार्थी, सहाय्यक शिक्षण प्रशासन पराग मुंढे, पर्यवेक्षिका  विनया जोशी, रोहिणी जोशी, सुजाता सणसे, पर्यावरण संवर्धन समिती अध्यक्ष विकास पाटील, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक  यावेळी उपस्थित होते. 
     अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे म्हणाले, स्वच्छता ही सेवा हा उपक्रम स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग आहे.  स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मधील ४ ते ३१ जानेवारी या कालावधीत आहे. आपले शहर या सर्वेक्षणात सहभागी झाले आहे. हा उपक्रम राबविण्याकरिता अभियानात जास्तीत जास्त नागरिक, विदयार्थी, शिक्षक यांचा सहभाग असणे गरजेचे असुन स्वच्छता मंचवर झालेल्या कार्यक्रमाची नोंद करणे, स्वच्छता अ‍ॅप डाऊन लोड कराव्यात.  हा उपक्रम राबविताना सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छता शपथ, स्वच्छता विषयक निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व स्वच्छता रॅलीचे आयोजन केले आहे. पालकांची सभा घेऊन घरामध्ये निर्माण होणारा कचरा ओला व सुका अशी वर्गीकरण वेगवेगळा करणे बंधनकारक असुन सर्वांनी आपला कचरा वर्गीकरण करुन महानगरपालिकेचे यंत्रणेकडे द्यावा. आपल्या घरातील कचरा पालिका संकलित करुन मोशी येथील कचरा डेपोमध्ये आणुन शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावली जाते हा संदेश पालक व विदयार्थ्यांपर्यत पोहोचवाव्यात.
 मुख्याध्यापकांना शाळेतील शिक्षकांची सभा घेऊन नियोजनानुसार कार्यक्रम राबविण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.मुख्याध्यापकांनी शाळांची अंतर्गत तपासणी वेळोवेळी करावी तसेच शाळेची स्वच्छता, परिसराची साफसफाई आणि स्वच्छतागृहे स्वच्छ राहतील याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले. क्रिसील प्रतिनिधी समिर पालपार्थी यांनी स्वच्छता मंच याविषयी सादरीकरण केले. विकास पाटील अध्यक्ष विकास पाटील यांनी शाळांमध्ये पर्यावरण संवर्धन समिती स्वच्छ भारत अभियानात सहाय्यभूत कामकाज करते तथापि विदयार्थ्यांनी राबविलेले उपक्रम स्वच्छता मंचवर नोंद करुन घेणेबाबत मार्गदर्शन केले.

Web Title: Pimpri Municipal Corporation's swachhta hi seva will be implemented still on 02 October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.