पिंपरीत विनामास्कची कारवाई करणाऱ्या पोलिसालाच मारहाण, एका वाहनचालकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 02:15 PM2021-05-10T14:15:55+5:302021-05-10T14:16:33+5:30

पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला म्हणून घातला वाद

In Pimpri, a policeman was beaten up and a driver was arrested | पिंपरीत विनामास्कची कारवाई करणाऱ्या पोलिसालाच मारहाण, एका वाहनचालकास अटक

पिंपरीत विनामास्कची कारवाई करणाऱ्या पोलिसालाच मारहाण, एका वाहनचालकास अटक

Next
ठळक मुद्देसरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पिंपरी: विनामास्क कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केला. म्हणून चारचाकी वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पिंपळे सौदागर येथे रविवारी (दि. ९) ही घटना घडली.

मनविंदर सिंग भाटीया (वय ४८, रा. रहाटणी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सांगवी वाहतूक पोलीस शाखेतील कर्मचारी सतीश जनार्दन देवकर यांनी रविवारी (दि. ९) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात वाहतूक पोलीस देवकर हे विनामास्क वाहन चालकांवर कारवाई करत होते. त्यावेळी आरोपी चारचाकी वाहनातून विनामास्क आला. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला असता तो वाहन न थांबवता पुढे निघून गेला. त्यानंतर सिग्नलला इतर वाहनांना अडथळा होईल, अशा पद्धतीने रस्त्यात वाहन उभे करून देवकर यांच्याकडे आला. त्याने फिर्यादीशी वाद घालून त्यांच्या हातात असलेले विनामास्क दंड करणारे पावती पुस्तक हातातून ओढून तसेच त्याचा वाहन परवाना पोलिसांच्या हातातून जबरस्तीने हिसकावून घेतला.  देवकर यांच्या शासकीय कामात अडथळा आणला. त्यांच्याकडून पावती पुस्तक घेत असताना त्याने पोलिसाच्या हातावर मारहाण केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Web Title: In Pimpri, a policeman was beaten up and a driver was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.