पिंपरीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; सहा महिलांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 06:38 PM2022-05-22T18:38:18+5:302022-05-22T18:38:33+5:30
वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करून हिंजवडी पोलिसांनी पीडित सहा महिलांची सुटका केली
पिंपरी : वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करून हिंजवडी पोलिसांनी पीडित सहा महिलांची सुटका केली. तसेच याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून एकाला अटक केली. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, चारचाकी वाहन जप्त केले. मुळशी तालुक्यातील बावधन येथे शनिवारी (दि. २१) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ही कारवाई केली.
विनायक मनोहर कुद्रेमणी (वय २०, रा. वारजे माळवाडी, पुणे), असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यासह राॅकी उर्फ ऋषिकेश कदम (रा. वारजे माळवाडी, पुणे) आणि स्नेहल कदम यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार राजेंद्र सीताराम कुरणे यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे पीडित सहा महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेत आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी कारवाई करून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. तसेच पीडित सहा महिलांची सुटका केली. आठ हजार रुपयांची रोकड, १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल, अडीच लाख रुपये कंपनीची चारचाकी गाडी पोलिसांनी जप्त केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.