पिंपरी सांडसला कचरा डेपो नाही : पाचर्णे
By admin | Published: January 6, 2017 06:21 AM2017-01-06T06:21:06+5:302017-01-06T06:21:06+5:30
पिंपरी सांडस हद्दीत होणारा कचरा डेपो होणार नाही. तसेच, भामा-आसखेडबाबत शेतकऱ्यांच्या जमिनीवरील शेरे कमी करणे, पिंपरी सांडस ग्रामस्थांच्या मागणीनुसार
पिंपरी सांडस : पिंपरी सांडस हद्दीत होणारा कचरा डेपो होणार नाही. तसेच, भामा-आसखेडबाबत शेतकऱ्यांच्या जमिनीवरील शेरे कमी करणे, पिंपरी सांडस ग्रामस्थांच्या मागणीनुसार भाजीपाला बाजार व शेळीबाजार यांसाठी जागा उपलब्ध करून दिल्यास सर्व सहकार्य करू, जेजुरी-बेल्हा रस्त्यासाठी निधी आला असून, ही सर्व कामे लवकरात लवकर करण्यात येतील, असे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी सांगितले.
पाचर्णे म्हणाले, साडेपाच मीटरचा रस्ता होणार असून, त्यासाठी १६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. रस्त्याचे काम चालू असताना शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. या रस्त्यावर कुठेही टोल आकारला जाणार नाही. पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य दादासाहेब सातव, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे, गणेश कुटे, माऊली वाळके, युवा नेते श्यामराव गावडे, शिवाजीराव गोते, श्यामराव कोतवाल, सरपंच सुवर्णा गजरे, बजरंग चितळकर, रोहिदास कोतवाल उपस्थित होते. आघाडी सरकारच्या काळात येथे भीमा नदीवर १५ कोटी रुपये खर्च करून शिरूर-हवेलीला जोडणाऱ्या पुलाचे काम माजी आमदार अशोक पवार यांच्या काळात झाले होते. (वार्ताहर)