पिंपरीत पोलिस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की; तिघांना ठोकल्या बेड्या

By नारायण बडगुजर | Published: June 19, 2023 06:17 PM2023-06-19T18:17:25+5:302023-06-19T18:17:54+5:30

चायनीजच्या गाडीवर सुरू असलेले काही जणांचे भांडण सोडवत असताना पोलिसाला धक्काबुक्की

Pimprit police sub-inspector punched; Shackles hit the three | पिंपरीत पोलिस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की; तिघांना ठोकल्या बेड्या

पिंपरीत पोलिस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की; तिघांना ठोकल्या बेड्या

googlenewsNext

पिंपरी : चायनीजच्या गाडीवर सुरू असलेले काही जणांचे भांडण सोडवत असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाला तिघांनी धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, तळेगाव स्टेशन येथे स्मिता चायनीज जवळ शनिवारी (दि. १७) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

दिनेश कसरत प्रधान (वय २४), सरोज जगन्नाथ माझी (वय २३), राजू बिसंभर प्रधान (वय २२, तिघे रा. वतननगर, तळेगाव दाभाडे. मूळ रा. झारखंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस उपनिरीक्षक मारोती मदेवाड यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षक मदेवाड त्यांच्या सहकाऱ्यांसह तळेगाव स्टेशन परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी चौकातील स्मिता चायनीज या दुकानाजवळ काही लोक भांडण करीत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार ते घटनास्थळी पोहोचले आणि भांडण सोडविण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळी आरोपींनी उपनिरीक्षक मदेवाड यांना धक्काबुक्की केली. यात फिर्यादीच्या शर्टचे आणि शोल्डरचे बटन तुटले. त्यामुळे पोलिस ठाण्यातून अधिकची कुमक मागवून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. आरोपींनी सरकारी कामात अडथळा निर्माण केला, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Pimprit police sub-inspector punched; Shackles hit the three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.