रिसर्च सेंटरसाठी जागेचे आश्वासन
By admin | Published: August 10, 2015 02:48 AM2015-08-10T02:48:22+5:302015-08-10T02:48:22+5:30
आगामी ३ महिन्यांत हाफकीनची ५ एकर जागा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे रिसर्च सेंटर उभारण्याकरिता मिळवून देण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे
पिंपरी : आगामी ३ महिन्यांत हाफकीनची ५ एकर जागा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे रिसर्च सेंटर उभारण्याकरिता मिळवून देण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे सामाजिक व न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिले.
महापालिकेच्या वतीने आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवाच्या समारोपप्रसंगी प्रसिद्ध महिला खंजिरी वादक शाहीर मीरा उमाप यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे कलारत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. रोख रक्कम रुपये अकरा हजार, स्मृतिचिन्ह व मानपत्र या स्वरुपात देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
शुक्रवारी उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांच्या अध्यक्षतेखाली भक्ती -शक्ती निगडी येथे समारोप कार्यक्रमास पक्षनेत्या मंगला कदम, अ प्रभाग अध्यक्षा वैशाली काळभोर, फ प्रभाग अध्यक्षा शुभांगी बोऱ्हाडे, अपक्ष आघाडी गटनेते सुरेश म्हेत्रे, नगरसदस्य गोरक्ष लोखंडे, तानाजी खाडे, रामदास बोकड, नगरसदस्या आशा सूर्यवंशी, माजी नगरसदस्य मारुती भापकर, रवींद्र खिलारे, प्रल्हाद सुधारे, किसन नेटके उपस्थित होते.
महोत्सव समिती अध्यक्ष भगवान शिंदे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आडागळे, संदीपान झोंबाडे, मनोज तोरडमल, दशरथ कसबे, डी. पी. खंडाळे, भानुदास साळवे, अशोक नेटके, सतीश भवाळ, केसर लांडगे, कांताबाई साठे, आशा शहाणे, हिरा शहाणे, सचिन वाघमारे, सतीश भवाळ, गणेश क्षीरसागर, धनंजय भिसे, भारती चांदणे, युवराज दाखले, मारुती दाखले, हनुमंत कसबे, केसर लांडगे, सचिन पारवे, मिलन शिंदे, सुनील भिसे, बापू गायकवाड, वसंत वावरे, सुभाष सरीन, निवृत्ती आरवडे आदी उपस्थित होते.
खंजिरीवादक शाहीर मीरा उमाप म्हणाल्या, ‘‘माझ्यासारख्या एका महिला कलाकाराचा आपण गौरव केला व प्रोत्साहन दिले, याबद्दल पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मी आभार मानते. मात्र, कलावंताना आर्थिक संकटांना नेहमी सामोरे जावे लागते. त्यासाठी राज्य शासनाने आमच्यासारख्या कलावंतांचा विचार करावा व सहकार्य करावे. आतापर्यंत मिळालेल्या विविध पुरस्काराने
माझे १० बाय १० चे पूर्ण घर भरलेले आहे. कौतुक व मायेची थाप माझ्या पाठीवर आहे. पुरस्काराने घर भरले, परंतु पोट भरलेले नाही. तेव्हा सरकारने दखल घेऊन मला हक्काचे घर
द्यावे.’’
बालेवाडी आयडॉल लिटिल चॅम्पियन पल्लवी घोडे व सुप्रसिद्ध शाहीर तुषार सूर्यवंशी यांच्यासह इयत्ता १०वी व १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा, तसेच वक्तृत्व, निबंध, रांगोळी, नृत्य व बँड स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचाही सत्कार या वेळी राज्यमंत्री कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे यांनी केले. (प्रतिनिधी)