विकास आराखडय़ातील रस्त्यांची आखणी करा

By admin | Published: November 11, 2014 12:33 AM2014-11-11T00:33:25+5:302014-11-11T00:33:25+5:30

23 गावांसह नव्या हद्दीमधील विकास योजना आराखडय़ात दर्शविलेल्या रस्त्यांची आखणी करून त्यानुसार प्रत्यक्ष जागेवर जाऊन रस्त्यांवर कायमस्वरूपी मार्किग करण्यात यावी, अशी

Plan the road in the development plan | विकास आराखडय़ातील रस्त्यांची आखणी करा

विकास आराखडय़ातील रस्त्यांची आखणी करा

Next

 पुणो : पुणो शहरातील जुनी हद्द व समाविष्ट 23 गावांसह नव्या हद्दीमधील विकास योजना आराखडय़ात दर्शविलेल्या रस्त्यांची आखणी करून त्यानुसार प्रत्यक्ष जागेवर जाऊन रस्त्यांवर कायमस्वरूपी मार्किग करण्यात यावी, अशी 

मागणी उपमहापौर आबा बागुल यांनी आज केली़ तसा प्रस्ताव शहर सुधारणा समितीला सादर करण्यात आला आह़े 
शहराच्या जुन्या हद्दीत आणि समाविष्ट 23 गावांमध्ये जवळपास 2 हजार किमीचे रस्ते कागदावर दिसत आहेत़ त्यावर अतिक्रमण होऊ नय़े तसेच, पुढील काळात ते ताब्यात घेताना त्याविषयीच संपूर्ण माहिती महापालिकेकडे असणो आवश्यक आह़े त्यातून रस्तेबांधणी विभागाला त्यांचा कामाचा नेमका आवाका लक्षात आल्याने त्यांना पंचवार्षिक कार्यक्रम हाती घेता येईल़ 
त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यासाठी एक प्रमाण उपलब्ध होईल, असे विविध 16 मुद्दे 
या प्रस्तावात मांडण्यात आले 
आहेत़ (प्रतिनिधी)
 
1क् कोटी रुपये खर्च
4रस्त्यांची आखणी करण्यासाठी महापालिकेने शासनाकडे 345 कोटी रुपये आतार्पयत भरले आहेत़ त्यातील अनेक रस्त्यांची अद्याप आखणी केलेली नाही़ 
4या 2 हजार किमी रस्त्यामध्ये 7़5 मीटरपासून 6क् मीटर्पयतच्या रस्त्यांचा समावेश आह़े त्याची आखणी करुन कायमस्वरूपी मार्किग करण्यासाठी साधारण 8 ते 1क् कोटी रुपये खर्च येऊ शकणार आह़े त्यातून रस्ते बांधणीच्या दृष्टीने सुनियोजित असे जाळे निर्माण होईल़ 
4हा प्रस्ताव शहर सुधारणा समितीला सादर करण्यात असल्याचे आबा बागुल यांनी सांगितल़े 

Web Title: Plan the road in the development plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.