स्मार्ट सिटीमुळे नियोजनबद्ध विकास

By Admin | Published: March 30, 2017 02:20 AM2017-03-30T02:20:11+5:302017-03-30T02:20:11+5:30

महानगरपालिकांच्या शास्वत विकासाला गती देण्याकरीता केंद्र सरकारने ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला.

Planned development due to Smart City | स्मार्ट सिटीमुळे नियोजनबद्ध विकास

स्मार्ट सिटीमुळे नियोजनबद्ध विकास

googlenewsNext

महानगरपालिकांच्या शास्वत विकासाला गती देण्याकरीता केंद्र सरकारने ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पाअंतर्गत देशातील १०० महत्त्वांची शहरे या साठी निवडण्यात आली आहे. राज्यातील १० शहरांची यासाठी निवड झाली असून पुणे शहर आणि पिंपरीचिंचवड या शहरांचाही यात समावेश झाला आहे. या प्रकल्पामुळे शहराचा झपाट्याने आणि नियोजनबद्ध विकास होणार आहे. या अंतर्गत सर्व पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार असून भविष्यात ही शहरे आदर्श शहरे म्हणून उदयास येणार आहे. यासाठी नागरिकांच्या सहभागातून अहवाल तयार करण्यात आला असून तो लवकरच केंद्र शासनाला पाठवण्यात येणार आहे.

केंद्र शासनामार्फत लोकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी, स्वच्छ, शाश्वत व पर्यावरण पूरक शहरे तयार करण्यासाठी ‘स्मार्ट सिटी अभियान’ या महत्वकांक्षी अभियानाची घोषणा पंतप्रधान यांच्या हस्ते गेल्या वर्षी करण्यात आली. या महत्वाकांक्षी अभियानामध्ये शहरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा, खात्रीशीर वीज पुरवठा, शहर स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन, कार्यक्षम शहरी दळणवळण व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, शहरी गरीबांसाठी परवडणारी घरे, सक्षम इंटरनेट सुविधा, शहरी आरोग्य आणि शिक्षण सुविधा, ई-गर्व्हनन्स व नागरिकांचा सहभाग, शाश्वत पर्यावरण, नागरीकांची सुरक्षा व संरक्षण इ. घटकांचा समावेश करण्यात आला आहे. या सुविधांचा विकास करण्यासाठी केंद्र सकरकारकडून निधी उपलब्ध होणार आहे.
या प्रकल्पात प्रथम फेरीत निवड झालेल्या यादीमध्ये २० शहरे, दुस-या यादीत ४० शहरे निवडणेत आलेली आहेत. या योजनेसाठी, महाराष्ट्रातील १० शहरांमध्ये निवड करण्यात आली. तिस-या व शेवटच्या यादी मध्ये नवी मुंबई ऐवजी पिंपरी चिंचवड शहराचा समावेश केला.
महानगरपालिकेच्या निवडणूकीपूर्वी केंद्र शाषणाच्या निकषानुसार या प्रकल्पाचा अहवाल बनविण्यासाठी ३ संस्थांकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या. स्मार्टसिटीचा प्रस्ताव बनविण्यासाठी क्रिसिल रिस्क अ‍ॅन्ड इंफ्रास्ट्कचर या संस्थेची निवड करण्यात आली होती. या संस्थेने अहवाल बनवला असून तो केंद्र सरकारकडे पाठविला आहे.
महापालिकेने शहराचा विकासाचा आराखडा बनवला आहे. पुर्नविकास, हरित पट्टा विकास आणि क्षेत्र आधारित विकासाचा आराखडा स्मार्ट सिटी अभियानाचे अंतर्गत शहराचा विकास करणेसाठी शहरातील एका क्षेत्राची निवड मॉडेल म्हणून करण्यात येणार आहे. या क्षेत्राचा या धोरणानुसार विकास करण्यात येईल. या भागाच्या विकासाच्या धर्तीवर शहरातीळ विविध भागात विकास कामे करण्यात येणार आहे. त्यामध्ये नागरिकांचाही सहभाग घेतला जाणार आहे. नागरिकांकडूनच शहरातील तीन ठिकाणांची प्राधान्यक्रमाने नावे नागरिकांकडून मागविणेत आलेली आहेत. यात रस्ते आणि चौकांचे अत्याधूनीकपणे शुशोभिकरण, उद्यांनांचा विकास, क्रीडांगण विकास, संपूर्ण वाहतूक व्यवस्थेचे एकमेकांशी संलग्नीकरण, हरित क्षेत्र विकास, समुदायिक कचरा व्यवस्थापन, समुदायिक पाणी व्यवस्थापन या अनुशंगाने विकास कामे करण्यात येणार आहेत.
शहराचा प्रकल्प आराखडा तयार करण्याासाठी शहरातील नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला. यामुळे हा अहवाल लवकरात लवकर तयार करता आला. जवळपास ८० हजार नागरिकांना विकासाच्या प्रक्रियेला प्रतिसाद दिला. यात सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करण्यात करण्यात आला
झोपडपट्टी निर्मुलन आणि झोपडपट्टी विरहित शहर ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी नागरिक, स्वयंमसेवी संस्थांचे प्रतिनिधी, जेष्ठ नागरिक, पोलिस वाहतुक शाखा, पुणे शहर पोलिस यांची मते जाणून घेण्यात आली. त्यांची वेळोवेळी बैठक घेण्यात आली. त्यांनी मांडलेल्या सुचनांची दखल घेऊन स्मार्ट सीटीचा अहवाल करण्यात आला. यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रस्ते व चौक अत्याधूनिक पद्धतीने नूतनीकरण करणे, उद्याने व क्रीडांगण विकास, हरित क्षेत्र विकास, समुदायिक कचरा तसेच पाण्याचे व्यवस्थापन, भाजी मंडई, शाळांची सुधारणा, कौशल्य विकास, सार्वजनिक आरोग्य इत्यादी घटकांचा विचार करण्यात आला आहे. या अहवालाचे काम पूर्ण झाले आहे. हा सर्वसमावेशक अहवाल ३१ पाठविण्यात येणार आहे. 

दिनेश वाघमारे
(लेखक पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त आहेत.)

 

 

Web Title: Planned development due to Smart City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.