‘एचआर’तर्फे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 03:53 AM2017-08-01T03:53:00+5:302017-08-01T03:53:00+5:30
एचआर कनेक्ट असोसिएशनच्या वतीने महाळुंगे येथे बालेवाडीजवळ वन विभागाच्या क्षेत्रात दीडशेहून अधिक वृक्षांचे रोपण करण्यात आले.
पिंपरी : एचआर कनेक्ट असोसिएशनच्या वतीने महाळुंगे येथे बालेवाडीजवळ वन विभागाच्या क्षेत्रात दीडशेहून अधिक वृक्षांचे रोपण करण्यात आले.
सुमारे ६८ कंपन्यांमधील एचआर अधिकाºयांनी मिळून हा उपक्रम राबविला. शहराचे संतुलन राखायचे असेल तर निसर्ग टिकला पाहिजे. समृद्ध वनराईतून निसर्ग समृद्ध होणार आहे. यासाठी असोसिएशनच्या वतीने दरवर्षी किमान १०० झाडे जोपासण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
ज्या सदस्यांचा वाढदिवस जुलै महिन्यात आहे, अशा सदस्यांचा वाढदिवस कार्यक्रमावेळी करण्यात आला. उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे. सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत असोसिएशनच्या सदस्यांनी कुटुंबीयांसमवेत वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला.
उपक्रमाच्या आयोजनासाठी एचआर कनेक्ट असोसिएशनचे पदाधिकारी संतोष चव्हाण, अनिल भोईटे, वनराज भोसले, चेतन मुसळे, अक्षय दिघे, सतीश पवार, धीरज अधिकारी, शिवाजी चौंडकर, मधुकर सूर्यवंशी, संजय वाघमारे, अर्जुन माने, विजय पाटील, सोपान फरांदे, आत्माराम बोचरे, सागर कडू, सोनाली देसाई, स्वप्निल कांगणे, आनंद जोशी, साई पाचंगे यांनी विशेष परिश्रम घेतले. असोसिएशनच्या वतीने यापुढे वेळोवेळी पर्यावरणपूरक कार्यक्रम घेतले जाणार असल्याचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी सांगितले.