पिंपरीत प्लास्टिकबंदी कारवाई सुरू : ऐशी हजार रूपयांचा दंड वसूल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 02:43 PM2019-08-19T14:43:08+5:302019-08-19T14:43:54+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्लॉस्टिकविरोधातील कारवाई सुरू केली आहे.

Plastic ban action started in Pimpri : A penalty of Rs 80,000 recovered | पिंपरीत प्लास्टिकबंदी कारवाई सुरू : ऐशी हजार रूपयांचा दंड वसूल 

पिंपरीत प्लास्टिकबंदी कारवाई सुरू : ऐशी हजार रूपयांचा दंड वसूल 

Next
ठळक मुद्देएकूण ७३० किलो प्लास्टिक जप्त

पिंपरी : महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्लास्टिक पिशव्या वापराविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. सलग तीन दिवसातील सुट्टीच्या दिवशी पिंपरी रिव्हर रोड व पिंपरी बाजारात धडक कारवाई करण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांचेमार्फत कारवाई करण्यात आली. ७३० किलो प्लास्टिक जप्त केला असून ऐशी हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे.  
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्लॉस्टिकविरोधातील कारवाई जोरात सुरू केली आहे. पिंपरी रिव्हर रोड व पिंपरी बाजारात धडक कारवाई केली. ही कारवाई आरोग्य वैद्यकीय अधिकारी अनिल रॉय, आरोग्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्य अधिकारी संजय कुलकर्णी, मुख्य आरोग्य निरिक्षक बेद राजू  यांचे मार्गदर्शनाखाली विविध टीम तयार करून केली.
आरोग्य निरिक्षक  सुरेश चन्नाल, सदाशिव पुजारी, शेखर निंबाळकर, योगेश फल्ले, शांताराम माने,  सतिश इंगेवाड, बाबासाहेब राठोड; तसेच आरोग्य मुकादम  पुखराज रेणवा, आरोग्य कर्मचारी प्रशांत पवार, स्वदेश साळुंके, अरूण राऊत, सचिन छपरीबंद, विशाल दाभाडे, हनुमंत सुरवसे, रविंद्र निला अशा कर्मचाऱ्यांच्या टीम तयार करून एकाच वेळी बाजारपेठेत कारवाई केली. त्यामध्ये सदगुरु किराणा, भावना इमिटेशन्स, पुजा ट्रेडर्स, गुडविल कलेक्शन, आर. आर. कॉफी विहार, रेखा एंटरप्राइजेस, पवन प्रोडक्ट्स, बालाजी हाऊस किपिंग, सागर ट्रेडर्स, साई फरसाण, जयशंकर डेअरी, अफगाण ड्रायफ्रुट, जगदंब ट्रेडर्स, के.डी.एस., महालक्ष्मी शॉपी, बालाजी शॉपी यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. एकूण ७३० किलो प्लास्टिक जप्त केले. प्रत्येकी पाच हजार रुपए यानुसार एकूण ऐशी हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे.

...... 

तीन दुकानदारांवर गुन्हे
पिंपरीतील तीन दुकाने गोविंद ड्रायफ्रूट, झुलेलाल ड्रायफ्रूट, कैलास क्रॉकरी या दुकानांनी प्लास्टिक जप्त करण्यास विरोध केला व दंड भरण्यास नकार दिल्यामुळे त्यांचेवर गुन्हा दाखल केला. 

डॉ. अनिल रॉय म्हणाले,पिंपरीत व्यापाऱ्यांनी जमाव गोळा करून कारवाईस विरोध केल्यामुळे पोलिसांना पाचारण केले होते. त्यानंतर काही दुकानांवर कारवाई केल्यावर व्यापाऱ्यांनी पुढील ७ दिवसांत या भागातील प्लास्टिक नष्ट करू, असे आश्वासन व्यापाऱ्यांनी दिले. त्यानंतर कारवाई थांबविण्यात आली.ह्णह्ण

Web Title: Plastic ban action started in Pimpri : A penalty of Rs 80,000 recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.