स्वीडन स्पर्धेसाठी पालिकेचे खेळाडू
By admin | Published: July 8, 2015 02:04 AM2015-07-08T02:04:26+5:302015-07-08T02:04:26+5:30
चिंचवड येथील एसकेएफ कंपनी स्पोटर््स अकादमीच्या १७ वर्षांखालील मुले आणि १६ वर्षांखालील मुलींच्या संघांची घोषणा मंगळवारी करण्यात आली.
पिंपरी : चिंचवड येथील एसकेएफ कंपनी स्पोटर््स अकादमीच्या १७ वर्षांखालील मुले आणि १६ वर्षांखालील मुलींच्या संघांची घोषणा मंगळवारी करण्यात आली. महापालिका शाळांच्या विद्यार्थी खेळाडूंच्या संघाचे नेतृत्व अनुक्रमे प्रफुल्ल पंडित व सना शेख हे करणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणारा मुलींचा देशातील पहिलाच संघ आहे.
संघाची घोषणा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शिशिर जोशीपुरा यांनी केली. या वेळी संचालक श्रीकांत सावंगीकर, पुणे फुटबॉल क्लबचे हेड आॅपरेशन्स चिराग तन्ना, कंपनीचे अधिकारी आदी उपस्थित होते. ‘मीट द वर्ल्ड’अंतर्गत स्वीडन येथे १२ ते १८ जुलै या कालावधी ‘गोथिया चषक’ युवा फुटबॉल स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत ७० देशांचे संघ सहभागी होणार आहेत. संघ शनिवारी (दि. ११) स्वीडनला रवाना होणार आहे.
मुलांच्या संघात प्रफुल्ल पंडित (कर्णधार), शुभम जाधव, शुभम शिंदे, अनिकेत देवकुळे, जयदीप लोखंडे, निखिल सोनवणे, करण भालेराव, विराज वाघमारे, इम्तिहाज शेख, तुषार उदगिरे, मौहम्मदयासर मेनन, शहाबाजखान पठाण, शुभम जाधव, साहिल वारतिया, फयाम रंगरेज (गोलरक्षक), निखिल मोरे, अर्जुन परिहार, तसेच विजय यादव (व्यवस्थापक), राकेश वाल्हेकर (प्रशिक्षक) यांचा समावेश आहे. मुलींच्या संघात सना शेख (कर्णधार), चित्रा गडहिरे, स्नेहा घाडगे, नुरजहॉँ शेख, सृष्टी लोंढे, ऋतिका
इंगळे, कुसुम शिंगारे, साबा शेख, अमिषा पटेल, सलमा खान,
नुसरत शेख, आशिया शेख, सिफा भेगडे, सनोबर भेगडे, पूजा यमगर, कीर्ती मोरे, तसेच सीमा सुमन (व्यवस्थापक), कल्पना दास (प्रशिक्षक) यांना स्थान दिले आहे. हे सर्व खेळाडू महापालिका शाळेचे विद्यार्थी आहेत.
अकादमीतर्फे या विद्यार्थी खेळाडूंना मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. सन २००५मध्ये या अकादमीची स्थापना केली गेली आहे. (प्रतिनिधी)