आचारसंहिता लागू होताच पीएमपी प्रशासनाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 02:54 AM2019-03-19T02:54:34+5:302019-03-19T02:54:47+5:30

आचारसंहिता लागू झाल्यानंतरही पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) काही बस आणि थांब्यांवर राजकीय पदाधिकाऱ्यांच्या जाहिराती झळकत होत्या.

 PMP administration action as soon as the code of conduct is implemented | आचारसंहिता लागू होताच पीएमपी प्रशासनाची कारवाई

आचारसंहिता लागू होताच पीएमपी प्रशासनाची कारवाई

Next

पिंपरी : आचारसंहिता लागू झाल्यानंतरही पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) काही बस आणि थांब्यांवर राजकीय पदाधिकाऱ्यांच्या जाहिराती झळकत होत्या. त्याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत जाहिरात फलक हटविण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी रविवारी (दि. १०) आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर ४८ तासांत राजकीय पदाधिकाऱ्यांच्या जाहिराती, छायाचित्रे हटविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. सरकारी जाहिरातींवरही निर्बंध घालण्यात आले. असे असतानाही शहरातील विविध मार्गांवर धावणाºया पीएमपी बसवर राजकीय पदाधिकाऱ्यांच्या जाहिराती झळकत होत्या. आचारसंहिता लागू झाल्यानंतर ४८ तास उलटल्यावरही या जाहिराती दिसून येत होत्या.
तसेच मोशीतील जय गणेश साम्राज्य चौकात पांजरपोळ शाळेशेजारील बसथांब्यावरही राजकीय पदाधिकाºयांची जाहिरात होती. या जाहिरातींमुळे आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीत बाधा निर्माण झाली होती.
शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवरही पीएमपी बसच्या फेºया होतात. यातील काही बसवर राजकीय पदाधिकाºयांच्या जाहिराती झळकत होत्या. याबाबत सामान्य नागरिकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.
शहर आणि पुण्यासह जिल्ह्यातील काही भागात पीएमपीची बससेवा आहे. पीएमपी आगारांमध्ये पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने आणि सर्वच बस आगारात जात नसल्याने काही बसवरील राजकीय पदाधिकाºयांच्या जाहिराती हटविण्यास विलंब झाला. आगारात पोहोचत नसलेल्या बसचा शोध घेऊन त्यावरील राजकीय जाहिराती हटविण्यात आल्या.
शहरातील रिक्षांवरही मोठ्या प्रमाणावर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपाच्या जाहिराती केल्या आहेत. पीएमपी प्रशासनाने बसवरील आणि बसथांब्यावरील जाहिराती हटविण्याची मोहिम राबवली. त्याप्रमाणात खासगी प्रवासी वाहतूक करणाºया रिक्षांवरील राजकीय जाहिरातींचे स्टिकर्स हटविण्याच्या सूचना आरटीओ कार्यालयाने रिक्षाचालकांना, रिक्षा संघटनांना दिल्या आहेत.
रिक्षांवरील राजकीय जाहिराती हटविण्याची मोहिम सुद्धा सुरू झाली आहे. रिक्षाचालकांनी स्वत:हून अशा जाहिराती काढून टाकाव्यात, असे सांगण्यात आले आहे. ज्या रिक्षाचालकांकडून राजकीय जाहिराती आणि स्टिकर्स हटवले जाणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका स्वीकारली जाईल, असेही कळविण्यात आले आहे.

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासाठी पीएमपी प्रशासन कटिबद्ध आहे. बस आणि थांब्यांवरील राजकीय जाहिराती हटविण्यात आल्या आहेत. यापुढेही त्याबाबत दक्षता घेण्यात येईल.
- सुभाष गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी

Web Title:  PMP administration action as soon as the code of conduct is implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.