दर बदलूनही पीएमपी ‘पास’, प्रशासनाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 02:47 AM2017-11-29T02:47:20+5:302017-11-29T03:45:52+5:30

शहरातील काही संघटनांकडून पास दरवाढी विरोधात स्वाक्षरी मोहिम सुरू असली तरी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) पास दरवाढ केली नसल्याचे स्पष्ट केले आहे. पासेसच्या रचनेत काही सुसंगत बदल करण्यात आले असून त्यालाही प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

 The PMP 'Pass' also changed the rate, the administration claimed | दर बदलूनही पीएमपी ‘पास’, प्रशासनाचा दावा

दर बदलूनही पीएमपी ‘पास’, प्रशासनाचा दावा

Next

पुणे : शहरातील काही संघटनांकडून पास दरवाढी विरोधात स्वाक्षरी मोहिम सुरू असली तरी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) पास दरवाढ केली नसल्याचे स्पष्ट केले आहे. पासेसच्या रचनेत काही सुसंगत बदल करण्यात आले असून त्यालाही प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हे बदल करूनही पासधारकांच्या संख्येत वाढच झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. त्यामुळे या बदलात पीएमपी ‘पास’ झाल्याचे चित्र आहे.
पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी ‘पीएमपी’चे रुतलेले चाक बाहेर काढण्यासाठी विविध पातळ््यांवर प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून दि. १ सप्टेंबरपासून त्यांनी विविध पासेसच्या रचनेत बदल केले आहेत. सध्या पीएमपीमध्ये विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक, इतर प्रवासी, दैनंदिन पास दिले जाता. त्यामुळे विद्यार्थी व ज्येष्ठ नागरीक पासमध्ये सवलत दिली जाते. पुर्वी विद्यार्थी व प्रवासी मासिक पाससाठी पालिका हद्द व हद्दीबाहेरसाठी वेगळे दर होते. त्यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. विद्यार्थी मासिक पास आता केवळ ७५० रुपयांचा करण्यात आला आहे. हद्दीचा मुद्दा हद्दपार करण्यात आला आहे. पुर्वी हद्दीसाठी ६०० व हद्दीबाहेरील प्रवाशांसाठी ७५० रुपये पास दर होता.
प्रवासी मासिक पासमध्येही असाच बदल करण्यात आला असून हद्दीचा मुद्दा रद्द करत केवळ १४०० रुपयांचा एकच पास ठेवण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरीकांसाठी ४५० रुपयांचा पास होता. त्यामध्ये अडीचशे रुपये वाढ करून ७०० करण्यात आला आहे. तर ५० रुपयांचा दैनंदिन पास बंद करून केवळ ७० रुपयांचा पास ठेवण्यात आला आहे. तसेच एका मार्गावरील पासही बंद करण्यात आला आहे. या बदलांना पीएमपी प्रवासी मंचसह विविध संस्था-संघटना व काही राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरीक पासमध्ये करण्यात आलेल्या वाढीला मोठा विरोध करण्यात येत आहे. ही पास दरवाढ असल्याचे सांगत संघटनांनी शहरात स्वाक्षरी मोहिम सुरू केली आहे. मात्र, सध्या तरी या मोहिमेला प्रशासनाकडून प्रतिसाद मिळताना दिसत नाही.

पासेसच्या रचनेत बदल करण्यात आला असला तरी ज्येष्ठ नागरीक मासिक पास वगळता विद्यार्थी व सर्वसाधारण प्रवासी पासधारकांमध्ये आॅगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात काहीशी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. मात्र, ज्येष्ठ नागरीक पासमध्ये मोठी घट झाली आहे. असे असले तरी ज्येष्ठ नागरीक दैनंदिन पासधारक तुलनेने वाढले आहेत. त्यामुळे पास रचनेत बदल केल्याचा प्रवासी संख्येत फरक पडला नसल्याचा दावा पीएमपी प्रशासनाने
केला आहे.


केवळ आकड्यांचा खेळ
पीएमपी प्रशासनाकडून केवळ आकड्यांचा खेळ केला जात आहे. ज्येष्ठ नागरीक मासिक पासमध्ये वाढ केल्याने अनेक प्रवाशांनी पाठ फिरवली दैनंदिन पासमध्ये निम्म्याने घट झाली आहे. याकडे डोळेझाक करून केवळ आकडे मांडले जात आहेत. एका मार्गासाठीचा पास बंद केल्याने अनेक प्रवाशी नाराज आहेत. या बदलांमुळे प्रवासी घटत चालले असून पीएमपीसाठी हा इशारा आहे. सध्याची प्रशासनाची भुमिका प्रवासीविरोधी असल्याचे दिसत आहे.
- जुगल राठी,
अध्यक्ष, पीएमपी प्रवासी मंच

केवळ आकड्यांचा खेळ
पासमध्ये कसलीही दरवाढ करण्यात आलेली नाही. भारतात स्वीकारण्यात आलेल्या सिध्दांतानुसार अनुदानित पासेसमध्ये सुसंगती आणण्यात आली आहे. काही बदल करूनही पासधारकांची संख्या कमी झालेली नाही. उलट त्यात वाढच झालेली दिसत आहे. तसेच एका मार्गाचा पास कोणत्याही शहरात नाही. त्यामुळे तो बंद करण्यात आला. हे बदल प्रवाशांनी स्वीकारले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- तुकाराम मुंढे, अध्यक्ष व
व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

विविध पास दराची सद्यस्थिती
पासचा प्रकार पूर्वीचे सुधारीत
विद्यार्थी मासिक ६००/७५० ७५०
प्रवासी मासिक १२००/१५०० १४००
ज्येष्ठ नागरिक मासिक ४५० ७००
ज्येष्ठ नागरिक दैनंदिन ४० ४०
प्रवासी दैनंदिन ५०/७० ७०

Web Title:  The PMP 'Pass' also changed the rate, the administration claimed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.