PMPML: पीएमपीचे वेळापत्रक कोलमडले; विद्यार्थी, चाकरमान्यांची होतेय गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 04:26 PM2023-07-28T16:26:48+5:302023-07-28T16:27:32+5:30

कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे विद्यार्थी, चाकरमान्यांची गैरसोय होत आहे....

PMP schedule collapsed; Students, servants are being inconvenienced PMPML | PMPML: पीएमपीचे वेळापत्रक कोलमडले; विद्यार्थी, चाकरमान्यांची होतेय गैरसोय

PMPML: पीएमपीचे वेळापत्रक कोलमडले; विद्यार्थी, चाकरमान्यांची होतेय गैरसोय

googlenewsNext

पिंपरी : सतत पडणारा पाऊस, रस्त्यावरील खड्डे आणि वाहतूक कोंडी यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसचे वेळापत्रक कोलमडले आहे. पीएमपीच्या काही मार्गांवर नागरिकांना बसची तासन्तास वाट पाहावी लागत आहे. कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे विद्यार्थी, चाकरमान्यांची गैरसोय होत आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील जीवनवाहिनी म्हणून पीएमपीकडे पाहिले जाते. पीएमपीकडून एकूण ३६९ मार्गांवर १७०० ते १८०० बसमार्फत सेवा दिली जाते. यातून दररोज ८ ते १० लाख प्रवासी प्रवास करतात. शहरात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जुना पुणे - मुंबई महामार्ग, चाकण-शिक्रापूर मार्ग, देहू-आळंदी मार्ग अशा विविध मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यांची अक्षरक्षः चाळण झाली आहे. यामुळे शहरातील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. तसेच काही ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे पीएमपीच्या बस उशिराने धावत आहेत. तर अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. वाहतूक कोंडी आणि कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

मी दररोज गुलटेकडीला कामाला जातो. दापोडी येथे रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. प्रवासात एक ते दीड तास जात आहे. महापालिका प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजवावेत.

- राहुल काळे, प्रवासी

काही मार्गांवर वाहतूक कोंडीमुळे बस उशिराने धावत असल्या तरी प्रत्येक मार्गांवर वेळेत बस सोडण्याचा प्रयत्न केले जात आहेत. तसेच जादा बस सोडण्याचे आदेश दिले आहेत.

- सतीश गव्हाणे, वाहतूक व्यवस्थापक

Web Title: PMP schedule collapsed; Students, servants are being inconvenienced PMPML

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.