PMPML: पीएमपीच्या १७ मार्गांवर मंगळवार आणि बुधवारी १०१ जादा बसेस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 09:27 PM2023-08-14T21:27:52+5:302023-08-14T21:30:02+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पर्यटकांना व भाविकांना प्रेक्षणीय व धार्मिक स्थळांना ये-जा करण्याकरिता १७ मार्गांवर १०१ जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे....
पिंपरी : स्वातंत्र्य दिन आणि पारसी नववर्ष निमित्ताने जोडून सार्वजनिक सुटी आली आहे. या कालावधीत नागरिक मोठ्या संख्येने देवदर्शनासाठी, पर्यटनासाठी जाण्याची शक्यता आहे. यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पर्यटकांना व भाविकांना प्रेक्षणीय व धार्मिक स्थळांना ये-जा करण्याकरिता १७ मार्गांवर १०१ जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरात आणि शहरालगत अनेक प्रेक्षणीय व धार्मिक स्थळे आहेत. शहरातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, शनिवार वाडा यासह शहरालगत असलेले जेजुरी, रांजणगाव, थेऊरगाव, मोरगाव, देहूगाव, आळंदी इत्यादी धार्मिक स्थळे आणि लोणावळा, सिंहगड आणि खाणापूर यासारख्या पर्यटन स्थळांना नागरिक मोठ्या संख्यने भेट देतात. मंगळवारी स्वातंत्र्य दिन आणि बुधवारी पारसी नववर्ष निमित्ताने दोन दिवस सार्वजनिक सुटी आहे.
या मार्गांवर जादा बस
हडपसर ते जेजुरी (२१०), हडपसर ते मोरगाव (२१२), निगडी ते लोणावळा (३६८), वाघोली ते रांजणगाव (१६१), हडपसर ते थेऊरगाव (१८३), हडपसर ते रामदरा (१८४), शनिवार वाडा ते सिंहगड (५०), म.न.पा. भवन ते देहूगाव (२६२), स्वारगेट ते आळंदी (२९), म.न.पा. ते आळंदी (११९), पुणे स्टेशन ते आळंदी (१५१), भेकराईनगर ते आळंदी (२०१), शेवाळवाडी ते आळंदी (२००), म्हाळुंगेगाव ते आळंदी (३६०), बाणेरगाव ते आळंदी (३४४), स्वारगेट ते खानापूर (५२), कात्रज ते सासवड (२०९).