भाजपची मते फुटली? महापालिकेत सत्ता असतानाही कोट्यापेक्षा आठ मते पडली कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 08:04 PM2021-11-12T20:04:18+5:302021-11-12T20:32:07+5:30

पीएमआरडीए हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील विविध विकासकामांच्या दृष्टीने पुणे महानगर नियोजन समितीची निवडणूक महत्वाची ठरणार आहे

pmrda bjp got eight votes less than quota pcmc | भाजपची मते फुटली? महापालिकेत सत्ता असतानाही कोट्यापेक्षा आठ मते पडली कमी

भाजपची मते फुटली? महापालिकेत सत्ता असतानाही कोट्यापेक्षा आठ मते पडली कमी

Next

पिंपरी :पुणे महानगर नियोजन समिती सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी नागरी मतदार संघात (पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका) मतमोजणी झाली. त्यात भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता असतानाही प्रत्येकाला १३ चा कोटा असताना सहा सदस्यांना कोट्यापेक्षा आठ  मते कमी पडली आहेत. त्यामुळे कोणाची मते फुटली. याचा शोध सत्ताधारी पक्षाकडून घेतला जात आहे.

पीएमआरडीए हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील विविध विकासकामांच्या दृष्टीने पुणे महानगर नियोजन समितीची निवडणूक महत्वाची ठरणार आहे. या निवडणुकीसाठी  मतदान झाले. मोठे नागरी मतदार संघासाठी (महापालिका) पुणे आणि पिंपरी महापालिका मुख्यालयात मतदान झाले. या मतदारसंघात  २२ जागा असून २४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पिंपरी महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे ६ आणि  राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ असे ९ उमेदवार रिंगणात होते.

पुणे महानगर नियोजन समिती सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी पिंपरीत ९८ टक्के मतदान झाले. १२४ नगरसेवकांपैकी १२२ नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजाविला. तर, परगावी असल्याने शिवसेनेचे १आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे १ असे २ नगरसेवक मतदान करु शकले नाहीत.  या निवडणुकीची मतमोजणी आज झाली.

निर्वाचित सदस्य-
सत्ताधारी भाजपकडून सभागृह नेते नामदेव ढाके, नगरसेवक चंद्रकांत नखाते, वसंत बोराटे, संदीप कस्पटे, जयश्री गावडे, निर्मला गायकवाड आणि विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजित गव्हाणे, मोरेश्वर भोंडवे, डॉ. वैशाली घोडेकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महापालिकेत १२८ नगरसेवक होते. त्यातील भाजप २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या २ अशा ४ नगरसेवकांचे निधन झाले होते. महापालिकेत १२४ नगरसेवक असून त्यातील १२२ नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजाविला. तर, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी १ नगरसेवक बाहेर असल्याने मतदान करु शकले नाहीत. भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार निवडूण आले आहेत.

पिंपरी-चिंचवडमधील मत पडली कमी
चिंचवड विधानसभेतील नामदेव ढाके यांना १३ मतांचा कोटा होता. त्यांना १२ मते पडली. तर संदीप कस्पटे यांना १३ चा कोटा होता. त्यांना ११ मते पडली. चंद्रकांत नखाते यांना १३ चा कोटा होता. त्यांना १० मते पडली. तर पिंपरी विधानसभेतील जयश्री गावडे यांना १३ चा कोटा होता. त्यांना ११ मते पडली. तर भोसरी मतदार संघातील निर्मला गायकवाड यांना १३ चा कोटा होता. त्यांना १४ मते पडली. तर वसंत बोराटे यांना १२ चा कोटा होता. त्यांना १२ मते पडली. पिंपरी आणि चिंचवड विधानसभेत आठ मते कमी पडली. कोणाची मते कमी पडली कोणाची फुटली याचा शोध पक्षश्रेष्ठी घेत आ

Web Title: pmrda bjp got eight votes less than quota pcmc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.