पीएमपीची सहा वर्षांत झाली तब्बल ६० टक्के भाडेवाढ
By admin | Published: December 19, 2014 01:50 AM2014-12-19T01:50:15+5:302014-12-19T01:50:15+5:30
र्वसामान्यांच्या वाहतूकीची जिवनवाहीनी असलेल्या पीएमपीची गेल्या सहा वर्षातील ही पाचवी दरवाढ असून या कालावधीत पीएमपीच्या तिकिटात तब्बल ५
पुणे : सर्वसामान्यांच्या वाहतूकीची जिवनवाहीनी असलेल्या पीएमपीची गेल्या सहा वर्षातील ही पाचवी दरवाढ असून या कालावधीत पीएमपीच्या तिकिटात तब्बल ५० ते ६० टक्क्यांची वाढ झाली आहे. तर या दरवाढीमुळे पीएमपी प्रवाशांची संख्या तब्बल ३० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे ही दरवाढ तोटा भरून काढण्यासाठी केली गेली असली, तरी प्रवाशी संख्या घटल्याने तोटा भरून निघणार का असा सवालही उपस्थित केला जात आहे.
गेल्या काही वर्षात सततची डिझेलवाढ होत असल्याने, तसेच चांगली सेवा देण्यात पीएमपी अपयशी ठरत असल्याने २००८ पासून आज अखेर पर्यंत पीएमपीची पाच वेळा भाडेवाढ करण्यात आली आहे. तर ही दरवाढ दरवर्षी सरासरी १० ते १२ टक्क्यांच्या घरात आहे. पीएमटी आणि पीसीएमटी एकत्र झाल्यानंतर पहिली दरवाढ २१ सप्टेंबर २००८ मध्ये १६.४५ टक्के करण्यात आली होती. त्यानंतर ८ जानेवारी २०१० मध्ये १५ टक्के दरवाढ करण्यात आली. पुढे २७ सप्टेंबरमध्ये ६ टक्के दरवाढ करण्यात आली. त्यानंतर अवघ्या सात महिन्यात पुन्हा १३ मार्च २०१३ मध्ये १२ टक्के दरवाढ करण्यात आली. त्यानंतर डिझेलचे दरवाढ सुरूच असल्याने तसेच पीएमपीचा तोटा वाढत असल्याने पुन्हा गुरूवारी २० टक्के दरवाढ करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)